पालकमंत्री शेतकर्यांच्या दारी, वरिष्ठ अधिकारी मात्र घरी

0
14

नागपूर,दि.12 : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी कीटकनाशक फवारणीमुळे मृत पावलेल्या शेतकºयांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच कुटुंबियांना योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. परंतु या भेटीदरम्यान अधिकाºयांची पुन्हा एकदा उदासीनता दिसून आली. पालकमंत्री मृत शेतकºयांच्या घरी भेट देत असताना एक-दोन वगळता वरिष्ठ अधिकाºयांनी या भेटीकडेच पाठ फिरवली.
जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन शेतकºयांचे मृत्यू झाले. परंतु ही गोष्ट अधिकार्यांनी लोकप्रतिनिधींपासून लपवून ठेवली. पालकमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी तातडीची बैठक बोलावली. त्या बैठकीत अधिकार्यांना सविस्तर माहिती विचारली असता कृषी अधिकार्यांना किती शेतकरी मृत्युमुखी पडले याची माहितीच देता आली नाही. तसेच महसूल, पोलीस आणि कृषी विभागाच्या अधिकार्यांमध्ये समन्वय नसल्याचेही दिसून आले. तेव्हा पालकमंत्र्यांनी तिन्ही विभागातील अधिकाºयांना चांगलेच फैलावर घेतले होते. तसेच मृतांच्या घरी भेटी देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करा व त्यांना योग्य ती मदत करा, असे निर्देशही दिले होते. या निर्देशाला अधिकार्यांनी केराची टोपली दाखविली.
बुधवारी स्वत: पालकमंत्र्यांनी जेव्हा मृत शेतकर्यांच्या घरी भेटी दिल्या. त्यावेळी कळमेश्वरच्या तहसीलदार डॉ. मोहने व तालुका कृषी अधिकारी जगदीश नेरुलवार हे अधिकारी सोडले तर महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा कृषी अधिक्षकासह वरिष्ठ अधिकार्यांनी या दौºयाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकर्यांच्या या मृत्यूबाबत एकूणच अधिकाºयांची असंवेदनशीलता व उदासीनता पुन्हा एकदा दिसून आली. पालकमंत्र्यांनी यासंदर्भात आपली नाराजीही व्यक्त केली.
कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या नरखेड तालुक्यातील खैरगाव येथील धनंजय वरोकार व कळमेश्वर येथील माणिक शेंडे यांच्या निवासस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. पालक मंत्र्यांसोबत काटोलचे आ. डॉ. आशिष देशमुख उपस्थित होते.