लाखनी येथे राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन

0
14

लाखनी,दि.31ः- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा, लाखनी तर्फे राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या एकता दौड स्पर्धेचे उद्घाटन  साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळाभाऊ काशिवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी  भाजयुमो महामंत्री शेषराव वंजारी, भाजपा तालुकाध्यक्ष पद्माकर बावनकर, सरपंच नरेंद्र भांडारकर, महामंत्री नीरज मेश्राम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ गिरीश निखाडे, जिल्हा उद्योग आघाडीचे संयोजक प्रशांत गायधने, अशोक चेटूलेे उपस्थित होते. ग्रामपंचायत, मानेगाव ते समर्थ क्रीडा संकुल, लाखनी ५ किमी अंतर पार पडायचे होते. या स्पर्धेत २५ महिला आणि १५० पुरुष स्पर्धकांनी भाग घेतला. श्रुती भोयर या पाच वर्षांच्या चिमुकली आणि राज्य स्तरावरील धावपटू स्वाती उईके यांनी भाग घेतला हे विशेष. महिला गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे स्वाती उईके, तेजस्विनी लांबकाने, नयना फेडर व पुरुष गटातून कुणाल कायते, देवेंद्र पाखमोडे, कोमेशवर रोटके यांना २०००,१५००,१००० रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे बक्षीस वितरण समर्थ प्रांगणातील क्रीडा संकुलात शिवराम गिर्हेपुंजे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी अंगेश बेहलपाडे, अजिंक्य भांडारकर, संदीप भांडारकर, विनायक शेंडे उपस्थित होते. या स्पर्धेला लाखनी पोलीस विभाग आणि लाखनी आरोग्य विभागाद्वारे विशेष सहकार्य केले गेले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चुडामनी कांकलवार, उमेश गायधनी, आकाश निखाडे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन अजिंक्य भांडारकर व आभार नीरज मेश्राम यांनी मानले.

2 Attachments