आलापल्ली-सिरोंचा मार्गावर खड्डेच खड्डे

0
12

आलापल्ली,दि.०१- ,: अहेरी उपविभागातील सर्वात जास्त वर्दळीचा आणि महत्वाचा मार्ग असलेल्या आलापल्ली-सिरोंचा या १०० किमी अंतराच्या मार्गावर तब्बल ७० किमी रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांची कसरत होत असून मागील दहा वर्षात पहिल्यांदाच इतकी मोठी बिकट अवस्था निर्माण झाली असल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहेत.अनेक पदाधिकारी, नेतेमंडळी याच माार्गाचा वापर करुन अहेरी तालुक्यातील काही गावांमध्ये तसेच सिरोंचा तालुक्यात सुद्धा दौरे करतात. मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेकडे कुणाचेच लक्ष जात नसेल काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सिरोंचा तालुका जिलह्याच्या टोकावर वसलेला आहे. तालुक्यातील नागरिकांना अहेरी, चामोर्शी, भागरागड, चंद्रपुर, गडचिरोली येथे जाण्यासाठी तसेच जिलह्यत इतरत्र कुठेही जाण्यासाठी आलापल्ली-सिरोंचा मार्गाशिवाय पर्याय नाही. या मर्गावरुन अवजडङ वाहनांसह राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, खासगी चारचाकी वाहने दिवसभर आवागमन करीत असतात. मात्र तब्बल ७० किमी रस्त्यावर खड्डे पडले असल्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
जिलह्यातील अन्य भागातील नगरिक सुद्धा तेलंगणा राज्यात जाण्यासाठी याच मार्गाने जातात. सोमनूर, कलेश्वराम आदि ठिकाणी दररोज जिलह्यातून शेकडो नागरिक जात असतात. मात्र आलापल्ली-सिरोंचा या खडतर मार्गावरुन प्रवास करताना चांगलीच दमछाक होत आहे. दुचाकी, सायकलने प्रवास करताना नागरिकांना चांगल्याच हालअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. आधीच या मर्गावर अनेक वळणे असून खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.