शहारवाणी जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्यांना मार्गी लावा-रोहीणी वरखडे 

0
10
गोरेगाव,दि.०३ :- तालुक्यातील शहारवाणी जिल्हा परिषद क्षेत्रात  दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे  धान पिक पाहणी करुन  शेतक-यांना रब्बी हंगामाकरीता बी बियाने मोफत देण्यात यावे व पाणी टंचाईवर मात करण्यासाठी हातपंप  मंजुर करण्यात यावे असी मागणी  जिल्हा परिषद सदस्य रोहणी वरखडे यांनी  केली आहे
   कमी पाऊस पडल्याने धानाचे उत्पादन घटले तसेच पिण्याचा पाणी प्रश्न उदभवत आहे यावर आळा  घालण्याकरीता या क्षेत्रातील गावाची पाहणी करुन तात्काळ हातपंप मंजुर करण्याची गरज आहे  सर्वाना काम मिळावा म्हणुन रोजगार हमी योजनेत प्रस्तावित अकुशल कामांना मंजुरी देण्यात यावी, धानाला बोनस जाहीर करावा, आय टी आय ते खाडीपार  फाटा रस्त्याचे काम जलद गतीने  करण्यात यावे,बोरगाव येथे आरोग्य उपकेंद्राला मंजुरी देण्यात यावी , कलेवाडा, शहारवाणी, गणखेरात पशुवैद्यकीय दवाखाना मंजुर यकर यावा, जिल्हा परिषद शाळा शहारवाणी, कवलेवाडा, बोरगाव, चिचगाव, गणखैरा, पुरगाव  या ठिकाणी वर्ग खोल्या मंजुर करण्यात यावे,  सुकपुर, बाघोली, शहारवाणी येथे अंगणवाडी इमारत तात्काळ मंजुर करण्याची आवश्यकता आहे शहारवाणी जिल्हा परिषद क्षेत्रात   आदिवासीयांची संख्या लक्षात घेता शासनांनी त्यांच्या विकासासाठी विविध योजनांना मंजुरी दिल्यास त्यांना रोजगाराबरोबर शिक्षणाच्या सवलती  मिळण्यास मदत होणार आहे या क्षेत्राच्या विवीध समस्या लक्षात घेता त्या मार्गी लावण्यात याव्या असी मागणी जिल्हा परिषद सदस्या रोहणी वरखडे यांनी केली आहे