मातृ सेवासंघाच्या पाठपुराव्याला यश

0
16
गोदिंया,दि.06 : दर रविवारप्रमाणे ५ नोव्हेंबरला देखील मातृसेवा संघाच्या सदस्यांनी बाई गंगाबाई रूग्णालयात भेट देवून स्वच्छतेविषयक आढावा घेतला. तसेच रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसोबत चर्चा करून स्वच्छतेविषयी जागृती निर्माण केली. विशेष म्हणजे, बाई गंगाबाई रूग्णालयातील समस्या व प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी मातृ सेवासंघाचा नियमीत पाठपुरावा सुरू आहे. या पाठपुराव्याला यश आले असून सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाला सुरवात झाली आहे.
मातृसेवा संघातर्फे दर रविवारी बाई गंगाबाई रूग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात येते. यावेळी रूग्णालय स्वच्छतेसोबत येथील सुरक्षेच्या प्रश्नाकडे देखील संघाकडून संबंधितांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न होतात. यासंदर्भात २७ आॅक्टोबर रोजी जि. प.उपाध्यक्ष रचनाताई गहाणे यांच्या नेतृत्वात संघाच्या सदस्यांनी स्वच्छता अभियानाअंतर्गत रूग्णालयात असलेल्या समस्या व प्रश्नांवर संबंधित अधिकाºयांशी संवाद  साधून याबद्दलचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले होते. निवेदनातून रूग्णालयातील समस्या व प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, पाठपुराव्याला यश येत असून सार्वजनिक शौचालयाच्य कामाला सुरवात झाली आहे. परंतु, नगरपरिषदेल्या दिलेल्या सुचना संदर्भात कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसले नाही. याबद्दल सेवा संघाचे सदस्य सातत्याने पाठपुरावा करून रूग्णालयातील स्वच्छता, सुरक्षा आदी सेवासुविधा रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत आहेत.या वेळेला बाई गंगांबाई मातृ सेवासंघातील रचनाताई गहाणे , सिताताई रहांगडाल,े सविताताई तुरकर, सौ. सविताताई बेदरकर,छायाताई दसरे, मोहिनीताई निबांर्ते, दिव्या भगत पारधी आदि महीला उपस्थित होत्या .