ओबीसींना स्वाधार योजनेसह वस्तीगृहाची सोय करा

0
12

चंद्रपूर,दि.09-ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना तालुका व जिल्हास्तरावर वस्तीगृह सरु करण्यात यावे.अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेली स्वाधार योजना ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात यावे.ओबीसी क्रिमीलेयरची मर्यादा 8 लाख करण्याचे शासन निर्णय काढण्यात यावे,या मागणीचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांच्या नेतृत्वात आज निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात महाराष्ट्र सरकारने क्रिमिलेयरची मर्यादा वाढीचे शासन निर्णय न काढल्याने नाॅन क्रिमिलेयर प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत.त्यासोबतच शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनेपासूनही विद्यार्थ्यांना वंचित राहण्याची वेळ आल्याने शासनाने त्वरीत क्रिमिलेयर उत्पन्न मर्यादा वाढीचे शासन निर्णय काढावे असे म्हटले आहे.निवेदन देतेवेळी आकाश चालुलकर,दिपक पिपलशेंडे,निलेश चालुलकर,शुभांगी भिवनकर,स्वाती चामरे,प्रिती जुनघरे,अश्विनी ढोके,मनिषा निब्रड,निकीता बनसोड,अपुर्वा भटारकर,तेजस्विनी चौधरी ,नयना यादव आदी उपस्थित होते.