26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ चंद्रपूरात 11 व 12 नोव्हेंबरला राज्यस्तरीय सर्व शाखीय शिंपी समाज मेळावा

चंद्रपूरात 11 व 12 नोव्हेंबरला राज्यस्तरीय सर्व शाखीय शिंपी समाज मेळावा

0
49

चंद्रपूर,दि.09ःः-विदर्भ शिंपी समाज मंडळ पुरस्कृत वैष्णव शिंपी समाज चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा द्वारा आयोजित “राज्यस्तरीय सर्व शाखीय शिंपी समाज उपवर- उपवधू परिचय मेळावा व सामुहिक मेळावा” शनिवार दिनाक ११ व रविवार १२ नोव्हेंबर २०१७ ला शकुंतला लाँन्स,(श्री संत नामदेव महाराज नगरी) विद्यानिकेतन शाळेसमोर,वडगाव चौक, नागपूर रोड, चंद्रपूर (महाराष्ट्र ) येथे आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राहणार आहेत. तर अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर राहणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूरचे आमदार नानाभाऊ शामकुळे, मोर्शी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. अनिल बोंडे, चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे,महापौर अंजलीताई घोटेकर, खापरखेडा महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजेंद्र राउत हे उपस्थित राहणार आहेत.
तर विशेष अतिथी मध्ये विदर्भ शिपी समाज मंडळाचे अध्यक्ष गुणवंतराव वाकरे,सचिव विजयानंद मुळतकर,कार्याध्यक्ष राजूभाऊ किटे,शरदराव कीटे, भास्करराव टोम्पे,प्रमोदराव कोरामकर,निताताई चौधरी, गजाजनराव बुटके, नागोराव बहादे हे सर्व उपस्थित राहणर आहे.
११ नोव्हेबर ला सकाळी १०.३० वाजता मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.त्यानंतर स्मरणिका “अक्षता ” चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केल्यानंतर उपवर- उपवधू परीचय सोहळा आयोजित करण्यात आला आहे.संध्याकाळी ६.३० वाजता समाजातीलच कलावंतानी साकारलेले नाटक “हृदयांतर ” एकांकिका सादर होणार आहे.१२ नोव्हेंबर २०१७ ला विदर्भ शिंपी समाज मंडळातर्फे समाज भूषण पुरस्काराचे वितरण व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.त्यामध्ये जिल्हा,तालुका अध्यक्ष,पदाधिकारी तसेच समाजातील लोकप्रतीनिधीचा सत्कार होणार आहे.सायकांळी 6 वाजता मेळाव्याचा सांगता होणार आहे.
या मेळाव्याला संपूर्ण विदर्भ तसेच पश्निम महाराष्ट्र, मुबई, पुणे, छत्तीसगड, राजस्थान , मराठवाडा येथील सर्व शिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.तरी सर्व समाज बांधवानी चंद्रपूर ला होणाऱ्या राज्यस्तरीय सर्व शाखीय शिंपी समाज उपवर-उपवधू परीचय मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहण्याचे आव्हान शिंपी समाज मेळावा आयोजन समिती चंद्रपूरचे अध्यक्ष अविनाश रेभनकर यांनी केले आहे.