मूल बपर क्षेत्रात पट्टेदार वाघाचा मृत्यू

0
8

चंद्रपूर,दि.15 ः- जिल्ह्याच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मूल बफर क्षेत्रात वाघ मृत्तावस्थेत आढळून आल्याची घटना आज बुधवारी संध्याकाळी उघडकीस आली. घटनास्थळावर मृत पट्टेदार वाघ खालेल्ल्या स्थितीत आढळून आले आहे. त्यामुळे दोन वाघाच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.मूल बफर क्षेत्रांतर्गत जानाळा-फुलझरी जंगल आहे. या जंगलात मोठ्या प्रमानात जंगली जनावरे आढळतात जंगलाता गस्त घालत असना-या वन कर्मचा-याना बुधवारी वाघ मृत्तावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती कर्मचा-यानी वरीष्टअधिका-याना दिली माहीती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनास्थळापासून काही अंतरावर अर्धे खालेल्यास्थितीत मृत पट्टेदार वाघाचा शव आढळून आला हद्दीचा झुंजीतून  एका वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेने वनविभागात खळबळ उडाली आहे. वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास वनाधिकारी करीत आहेत.