शाळांमध्ये क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती साजरी

0
10

गोंदिया,दि. १६ – गोरेगाव तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगांव बु. येथे “क्रांतीसूर्य बिरसा मुंडा” यांची जयंती साजरी करण्यात आली.सर्व प्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या प्रसंगी शिक्षक टी.एफ.इडपाचे,बी.सी.गजभिये यांनी आपले विचार व्यक्त केले.तसेच काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बिरसा मुंडा यांच्या कार्या विषयी सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाचे संचालन डी.डी.चौरागडे यांनी केले.या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक/शिक्षकेत्तरकर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद मुलांची शाळा चुटीया येथे सुध्दा  महान नायक बिरसा मुंडा यांची जंयती साजरी करण्यात आली. याप्रसंगी निंबध स्पर्धा व वक्तृव स्पर्धा घेण्यात आली,शिक्षिका यशोधरा सोनवाने यांनी मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे जि.प.शाळा रजेगाव येथे क्रांतीवीर बिरसामुंडा यांची जयंती दीपप्रज्जलन व पुष्पमाल्यार्पन करून साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यध्यापक सौ.पी.पी.रणदिवे व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती बी.आर.पटले,एस.जी.गौतम,खोहरे ,श्रीमती बडवाइक उपस्थित होत्या.या कार्यक्रमातर्गत क्रांतीवीर बिरसामुंडा यांच्या विद्यार्थी जीवनावर व कार्यावर प्रकाश टाकून त्यांच्या कामगिरीचे महत्व सांगण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वक्तुत्व स्पर्धा ,निबंध,चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.संचालन शाळानायक प्रेमकुमार रहांगडाले व आभार मनीष बावनथडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेेसाठी सर्व शिक्षक,विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.