गुरुवारी पालकमंत्री नवेगावबांधमध्ये घेणार डीपीडीसी आढावा बैठक

0
19

गोंदिया,दि.२८ : दिनांक २९ रोजी सकाळी ९ वाजता सडक/अर्जुनी येथून नवेगावबांधकडे प्रयाण करतील. सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह नवेगावबांध येथे जिल्हा नियोजन विकास समिती अंतर्गत प्रारुप आराखडा (सन २०१५-१६) तयार करण्यासाठी विविध विभागनिहाय आढावा बैठक घेतील. रात्री १० वाजता सडक/अर्जुनी कडे प्रयाण करतील. रात्री १०.३० वाजता सडक/अर्जुनी येथे आगमन व मुक्काम.
दिनांक ३० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता सडक/अर्जुनी येथून नवेगावबांधकडे प्रयाण करतील. सकाळी ९.३० वाजता नवेगावबांध येथे आगमन व राखीव. सकाळी १० वाजता जिल्हा नियोजन विकास समिती अंतर्गत प्रारुप आराखडा (सन २०१५-१६) तयार करण्यासाठी शासकीय विश्रामगृह लॉगहट येथे विविध विभागनिहाय आढावा बैठक घेतील. रात्री १० वाजता नवेगावबांध येथून सडक/अर्जुनी कडे प्रयाण करतील. रात्री १०.१० वाजता सडक/अर्जुनी येथे आगमन व मुक्काम करतील.