31.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home Top News सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे गुरुवारी अजुर्नी मोरगावात

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे गुरुवारी अजुर्नी मोरगावात

0
34

गोंदिया,दि.२८ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हे आज २९ जानेवारी रोजी जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. सकाळी ९.२० वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने कोहमाराकडे प्रयाण करतील. सकाळी ११.३० वाजता कोहमारा येथे आगमन व स्वागत. सकाळी ११.४५ वाजता कोहमारा येथून मोटारीने अर्जुनी/मोरगावकडे प्रयाण. दुपारी १२.३० वाजता शासकीय विश्रामगृह अर्जुनी/मोरगाव येथे आगमन व राखीव. दुपारी १२.४५ वाजता अर्जुनी/मोरगाव येथील पंचायत समिती मैदान येथे आयोजित शिवसेना पक्ष मेळाव्याला उपस्थित. दुपारी २.३० वाजता अर्जुनी/मोरगाव येथून मोटारीने नवेगावबांधकडे प्रयाण. दुपारी २.४० वाजता जिल्हा परिषद विश्रामगृह नवेगावबांध येथे आगमन व राखीव. दुपारी ३ वाजता नवेगावबांध येथील जिल्हा परिषद विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. सायंकाळी ५ वाजता नवेगावबांध येथून मोटारीने नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील.