जखमी जवानास उपचारासाठी नागपूरला हलविले
अालापल्ली,दि.16 – नक्षलविरोधी शोधमोहिमेवर जात असताना वाहनामध्ये बसलेल्या एका जवानाच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटून जवानाच्या पायाला लागल्याने जवान जखमी झाल्याची घटना सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. सुरेश खोबरागडे असे जखमी जवानाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार अहेरी येथील प्राणहिता पोलिस मुख्यालयातून पातागुडम जंगल परिसरात नक्षलविरोधी शोधमोहिम राबविण्यासाठी जवान ट्रकमध्ये बसून जात होते. यावेळी ट्रकमधील एका जवानाच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटून जवळच बसलेल्या सुरज खोबरागडे याच्या पायात घुसून आरपार निघाली. यात सुरश खोबरागडे हा जवान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.




