24.8 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ टेक्सटाईल पार्कच्या सीएसटी प्लँटमध्ये स्फोट

टेक्सटाईल पार्कच्या सीएसटी प्लँटमध्ये स्फोट

0
25

हिंगणघाट,दि.23ः – गीमाटेक्स्टच्या वर्धा मार्गावरील सीएसटी प्लँट बेला येथे काल बुधवारला स्फोट झाला. यात सुमारे तीन कोटींचे नुकसान झाले. सदर युनिट ‘अंडर ट्रायल’ असल्याने मागील २० दिवसांपासून बंद आहे. यामुळे सुदैवाने जीवहानी टळली. याबाबत व्यवस्थापनाने पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.
एक वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्धा मार्गावरील बेला शिवारात स्थापित टेक्सटाईल पार्कमध्ये हा अपघात झाला. सुमारे १५ कोटींच्या या प्रकिया उद्योगात सरकीपासून तेल व डीओसी वेगळे करणारे चीनी बनावटीचे ‘एस्पँक्टर’ परीक्षणात असताना हा अपघात झाला. रेल्वे गाडीच्या डब्यासारखे दिसणारे सदर संयंत्र मागील दोन-तीन महिने सुरू होते; पण १ नोव्हेंबरपासून युनिट बंद आहे. त्याच्या देखभालीचे काम सुरू असताना बुधवारी अपघात झाला. या बंद संयंत्रात गॅसचा दाब वाढला असता ‘सेफ्टी व्हॉल’ उघडला नाही. यामुळे मोठा स्फोट होऊन परिसर हादरला.

blank