सालेकसात नगराध्यक्षपदासाठी ९ अर्ज

0
11

सालेकसा,दि.26ः सालेकसा नगर पंचायतमध्ये एकूण १७ नगरसेवक, त्यासोबतच थेट मतदारांच्या माध्यमातून नगराध्यक्षाची निवडणूक होणार आहे. येत्या १३ डिसेंबर रोजी होणार्‍या मतदान कार्यक्रमात आपल्या पक्षाच्या उमेदवाराला नगराध्यक्षपदावर आरुढ होण्याची प्रथम संधी लाभावी, यासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे चारही पक्ष दमदार उमेदवार शोधत आहेत. विशेष म्हणजे नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने एकीकडे सर्वसामान्य वर्गातील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे काही दिग्गज कार्यकर्ते या निवडणुकीला विशेष महत्व देत नसले तरी अनुसूचित जमातीचे कार्यकर्ते आपल्यासाठी सुवर्ण संधी मानून उमेदवारीसाठी आपला फिल्डिंग लावीत होते. २४ नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदासाठी ९ तर नगरसेवकपदासाठी ६८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले झाले.