शेतकरी धडकले वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर

0
16

वाशिम,दि.29 – सन २०१६-१७ या वर्षात बिजोत्पादन केलेल्या बियाण्याचे उत्पादन अनुदान तसेच वितरण अनुदान देण्याच्या मागणीसाठी शेतकरी उत्पादक गटाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले.
पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकºयांनी उत्पादक गट स्थापन करून विविध उद्योगधंद्यांत पाय रोवण्याला सुरूवात केली आहे. शेतमालावर आधारित उद्योगधंदे उभारण्यासाठी शासनाकडून अनुदानदेखील देण्यात येते. सन २०१६-१७ या वर्षातील बियाणे उत्पादन व वितरणाचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी सुरूवातीला कृषी विभागाशी चर्चा केली. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देत योग्य तो तोडगा काढण्याची मागणी केली. अनुदान मिळाले नसल्याने उत्पादक गटातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळत असल्याचा मुद्दा शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिला. यावेळी गजानन अवचार, पंजाबराव अवचार, विलासराव गायकवाड, उमेश वाझूळकर, रवींद्र बोडखे, माधव लहाने, शिवाजी भारती,  विठ्ठलराव लहाने आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्याशी चर्चा केली.