सालेकसा नगरपंचायत अध्यक्षपदी भाजप बंडखोर विरेंद्र उईके विजयी

0
11

गोंदिया,दि.१४ः- जिल्ह्यातील सालेकसा नगरपचांयतीच्या पहिल्याच निवडणुकीत अध्यक्षपदाची माळ जनतेने राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना डावलत अपक्ष व भाजपचे बंडखोर विरेंद्र उईके यांच्या गळ्यात टाकली आहे.उईके यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी हातात टोपली घेत भाजपचा कमळ मुरझवल्याची चर्चा सुरु झाली आहे.१७ नगरसेवकासाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत ५ भाजप,४ काँग्रेस,२ शिवसेना व ६ अपक्ष उमेदवारांनी विजय मिळविला आहे.विशेष म्हणजे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदारांनी चांगलाच धुव्वा उडविला असून एकाही उमेदवाराला विजय मिळविता न आल्याने तालुक्यात राष्ट्रवादीची पिछेहाट सुरु झाल्याची चर्चा आहे.