अँप्रेन्टीस युनियनच्या मोर्च्याला राज्यमंत्र्याचे आश्वासन

0
3

नागपूर, दि.१६– मागील २५ वर्षांपासून अँप्रेन्टीस युनियनतर्फे वेगवेगळय़ा प्रकारची आंदोलने करून न्यायासाठी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, सरकार त्यांच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष करीत असल्याने आज शुक्रवारी महाराष्ट्र राज्य अँप्रेन्टीस युनियनतर्फे विधानभवनावर धडक मोर्चा काढण्यात आला. दुपारी बाराच्या सुमारास युनीयनचे अध्यक्ष दामोदर चंगोले, राहुल रेवतकर,महासचिव दिगांबर कटरे ,अनिल गोरे(उपाध्यक्ष),सचिन लाखे (कार्याध्यक्ष),सचिन सराफ (सहसचिव)आदींच्या नेतृत्वात इंदोरा मैदान येथून मोर्चाला सुरुवात झाली. एलआयसी चौकात मोचार्ला अडविण्यात आले. यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. १९९५ च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार अँप्रेन्टीसांना तिन्ही कंपनीत १00 टक्के सामावून घेणे, महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रानुसार अँप्रेन्टीसांचे १0 टक्के रिझर्व्हेशन वाढवून ५0 टक्के करण्यात यावे, महावितरण कंपनीत ‘उपकेंद्र सहायक’करिता २0१५ मध्ये काढलेली जाहिरात रद्द करून पुन्हा नव्याने काढण्यात यावी, तिन्ही कंपनीत भरतीकरिता वयाचे बंधन महाराष्ट्र शासनाप्रमाणे असावे, आदी १२ मागण्यांसाठी हा मोर्चा होता. म.रा.अॅप्रेनटीस युनियन इंटक चा मोर्चा विधानभवनावर गेल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे राज्य ऊर्जा मंत्री मदन येरावार साहेब यांनी शिष्टमंडळाला पाचारण करीत मागण्यावर चर्चा केली.त्याआधी आमदार भाई जगताप यांनी मोर्च्याला मार्गदर्शन केले.