बीआरएसपीचा सरकारविरुद्ध एल्गार-अँड. डॉ. सुरेश माने यांचा इशारा

0
15

नागपूर,दि.१६– निवडणुकीपूर्वी वेगळय़ा विदर्भाचे सर्मथन करणारे आज विदर्भ सक्षम करण्याचे सांगत आहेत. विदर्भ राज्याची निर्मिती न करणे म्हणजेच विदर्भातील जनतेशी विश्‍वासघात करण्यासारखे आहे, अशी टीका बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. सुरेश माने यांनी केली. २0१९ मध्ये विदर्भ राज्य मिळाले नाही तर बीआरएसपीतर्फे मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही माने यांनी दिला.
वेगळा विदर्भ, शेतकर्‍यांचे प्रश्न, आदिवासी, बेरोजगारीच्या प्रश्नावरून बीआरएसपीने आज डॉ. सुरेश माने यांच्या नेतृत्वात सरकारवर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. पवित्र दीक्षाभूमीवरून मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. टेकडी रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोर्चेकर्‍यांची गर्दी होती. भव्य सभामंच उभारण्यात आला होता. पुढे बोलताना अँड. माने म्हणाले शेतकरी उपाशी आणि उद्योगपती तुपाशी अशी स्थिती निर्माण करण्यात आली आहे. कारण उद्योगपतींचे कर्ज माफ होते. मात्र, लाखोंचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍यांची कर्जमाफी होत नाही. हे सरकार केवळ भांडवलदारांचे आहे. त्यांना शेतकरी, गरीब नागरिकांची चिंता नाही, असे रोखठोक सांगत सरकारविरुद्ध शक्तिप्रदर्शन केले.
महागाईवरून केंद्र आणि राज्य सरकारचा खरपूस समाचार घेताना अँड. माने म्हणाले, पाकिस्तानसारख्या देशात पेट्रोलचे भाव ४0 रुपये आहे, तर श्रीलंकेला पेट्राल भारतातून पाठविले जाते. तरी तिथे पेट्रोल दर ४८ रुपये आहे. मात्र, या देशात ८२ रुपयांपर्यंत पेट्रोल विकले जाते. सिलेंडरचे भाव वाढले आहे. यावरून सरकार गंभीर नाही, असा आरोपही त्यांनी केला. मोर्चाचे नेतृत्व अँड. सुरेश माने, दशरथ मडावी, सर्वजित बनसोडे, भीमराव केराम, डॉ. रमेश जनबंधू, अहमद कादर, र्शावण भानारकर, प्रा. सुनील वाकेकर यांनी केले.