ग्रामगितेतील एक-एक ओळ क्रांती निर्माण करणारी – अरूणभाई गुजराथी

0
9

अकोला,दि.23: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे व्यक्तीमत्व सिंधुसारखे आहे. राष्ट्रसंतांच्या साहित्यातून जीवन जगताना माणुसकीला महत्व दिले पाहिजे. याचा विचार रूजुविला. युवकांना स्फूर्ती देणारे, चैतन्य निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य आहे. ग्रामगीता ही राष्ट्रविकासाचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येकाने ग्रामगितेतील विचार अंगीकारला पाहिजे. ग्रामगितेतील एक-एक ओळ क्रांती निर्माण करणारी आहे. असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी केले.
अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळातर्गंत स्वराज्य भवन प्रांगणात शनिवारपासून सुरू झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ वा पुण्यतिथी-पुण्यस्मरण महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गुरूकुंज मोझरी येथील अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे होते. प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प गुलाबराव महाराज, काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी, माजी आ. गजानन दाळू गुरूजी, सावळे गुरूजी, सुशील महाराज वणवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत पिसे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार मुलचंदानी, डॉ. पुरूषोत्तम तायडे, प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, प्रा. डॉ. संतोष हुशे, शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदिश पाटील मुरूमकार, कृष्णा अंधारे, मनोज तायडे, नगरसेवक हरिश आलिमचंदानी, डॉ. स्वप्नील ठाकरे, दिलीप आसरे, काशीराव पाटील, प्रा. बाविसकर, रामदास देशमुख, सुधा जवंजाळ, रवींद्र मुंडगावकर, गंगाधरराव पाटील, मधुकरराव सरप, जिल्हा सेवाधिकारी किशोर वाघ, अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकारिणी सदस्य भानुदास कराळे, अ‍ॅड. रामसिंग राजपूत, विजय जानी आदी होते.