जबलपूर ब्रॉडगेजचे काम पूर्ण करा-एनसीपीचे निवेदन

0
19

गोंदिया,दि.४ : गोंदिया-जबलपूर लाईन ब्रॉडगेजचे काम लवकर पूर्ण करा यासह अन्य प्रवाशी मागण्यांची पूर्तता करण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक (जी.एम.) सुनील सोईन यांना निवेदन देण्यात आले. सोईन यांनी बुधवारी (दि.३) गोंदिया स्थानकाला भेट दिली असता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन चर्चा केली.
चर्चेत शिष्टमंडळाने गोंदिया-जबलपूर लाईन ब्रॉडगेजचे काम लवकर पूर्ण करून लोकार्पण करण्यात यावे, गोंदिया -बालाघाट-कंटगी दरम्यान फेºया वाढवा, शॉपींग मॉलमधील दुकानांचे बेरोजगारांत त्वरीत वितरण करावे, अर्जुनी-मोरगाव रेल्वे स्थानक प्रवासी सुविधांनी युक्त करावे, गोंदिया-डोंगरगड दरम्यान नवी गाडी सुरू करावी, भुवनेश्वर लोकमान्य टिळक सुपर फास्ट गाडी ( १२८७९-१२८८०) व पुरी-लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचा (१२७४५-१२७४६) गोंदियात थांबा देणे, रेल्वेच्या सरकारी तलावाचे सौंदर्यीकरण करणे, प्रवाशांची वाढती संख्या बघता गोंदिया-बालाघाट दरम्यान शटल गाडी सुरू करणे, महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये नागपूर-गोंदिया प्रवासादरम्यान सर्व आरक्षीत कोचमध्ये पूर्वी प्रमाणे साधारण तिकीटावर प्रवासाची सुविधा देणे आदि विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सोईन यांना दिले.
शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेवर सोईन यांनी लवकरच सहानुभुतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात शहर अध्यक्ष अशोक सहारे, जिल्हा उपाध्यक्ष शिव शर्मा, नगरसेवक सतीश देशमुख, शहर उपाध्यक्ष नानू मुदलीयार, खालीद पठाण, विद्यार्थी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष केतन तुरकर, विष्णू शर्मा, रमन उके, वामन गेडाम, सोनू येडे, सौरभ गौतम, प्रवीण पटले, विलास मेश्राम, सुनील मेश्राम व अन्य उपस्थित होते.

याचवेळी रेल्वेकमिटीचे माजी सदस्य रमणकुमार मेठी,चिनू अजमेरा,गोकूल कटरे आदींनी निवेदन देत नागपूर-पुणे गरीबरथ गोंदियापर्यंत विस्तारीत करण्याची मागणी केली.सोबतच गोंदिया-शेगाव ही नवी  इंटरसिटी रेल्वेगाडी सुरु करणे,बरोनीला सालेकसा येथे थांबा देणे,गोंदिया-डोंगरगड तसेच गोंदिया -नागपूर दरम्यान फास्ट लोकल सुरु करणे आदीचे निवेदन सादर केले.