आंबेनाला प्रकल्प लवकरच पूर्ण होणार-आ.विजय रहागंडाले

0
13

तिरोडा,दि.15 : आजपर्यंत ज्या ज्या कामामध्ये हात घातले ते ते काम यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे. भुराटोला लघू पाटबंधारे प्रकल्पामुळे ४८९ हेक्टर शेतीला सिंचन होईल. याचे काही काम पूर्ण झाले असून निधीअभावी काही काम रखडले होते. सततचा पाठपुरावा व कार्यकारी अभियंता फाडके यांच्या सहकार्याने भुराटोला लघू प्रकल्पाचे काम जून २०१८ पर्यंत पूर्ण होईल. तसेच ४० वर्षांपासून रखडलेला आंबेनाला प्रकल्प सुध्दा लवकरच पूर्ण होईल, असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी रविवारी (दि.१४) येथे प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी केले.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत, विदर्भ पाटबंधारे विभाग महामंडळ नागपूरमधील भुराटोला लघू पाटबंधारे प्रकल्प तालुका तिरोडाचे भूमिपूजन आ. रहांगडाले यांच्या हस्ते, माजी आ. भजनदास वैद्य यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार, माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, कार्यकारी अभियंता पृथ्वीराज फाडके, सरपंच कमलेश आतीलकर, प्रकाश भोंगाडे, जि.प. सदस्य राजलक्ष्मी तुरकर, पं.स. सदस्य पवन पटले, कृउबासचे सदस्य तेजराम चव्हाण, चतुर्भूज बिसेन, मिलिंद कुंभरे, उपसरपंच बाबू कटरे उपस्थित होते.
आ. रहांगडाले म्हणाले, या प्रकल्पामुळे शेतकºयांना शेतीसाठी पाणी मिळेल व त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. प्रकल्पाच्या कामासाठी ग्रामपंचायतची एनओसी लागत होती. ती पं.स. सदस्य पवन पटले तसेच सरपंचांनी तत्काळ मिळवून दिली. हा आपल्या तालुक्यातील पहिलाच प्रकल्प आहे की ज्याचे पाणी शेतीला कॅनलद्वारे न जाता पाईपने जाईल, तेही जमिनीच्या ३ फूट खालून. त्यामुळे शेती, जमीन जाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. प्रत्येक शेतकºयासाठी व्हॉलची व्यवस्था असणार आहे. धापेवाडा प्रकल्पाला १५ वर्षांपासून गती नव्हती. हा प्रकल्प २००४- ०५ मध्येच पूर्ण झाला असता तर आता दुष्काळ पडला नसता, असे ते म्हणाले.
प्रास्ताविकातून उपकार्यकारी अभियंता के.एस. मुनगनिवार यांनी, हा प्रकल्प निधीअभावी रखडला होता. परंतु आ. रहांगडाले यांच्या प्रयत्नाने मार्गी लागला असून जून १८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. कार्यकारी अभियंता फाडके यांनी या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यास आ. रहांगडाले यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. पंचायत समिती सदस्य पवन पटले यांनी शेतकºयांना शेती अधिग्रहण करताना नुकसानभरपाई कमी मिळाली, ते मिळवून देवू असे सांगितले. नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांनी, ४० वर्षे जुनी पाणी पुरवठा योजना तिरोडावासीयांना पुरेशी नव्हती. आता नवीन २७ कोटी रुपयांची योजना मंजूर करवून दिली. आम्ही एक पाऊल समोर टाकतो तर आ. विजय रहांगडाले आम्हाला १०० पावले पुढे नेतात, असे सांगितले. डॉ. चिंतामन रहांगडाले यांनी भुराटोला, आंबेनाला, धापेवाडा टप्पा-२ यामुळे तालुक्यात हरितक्रांती येणार असल्याचे सांगितले. मदन पटले यांनी या प्रकल्पाच्या पूर्णतेमुळे परिसरातील शेतकरी समृद्ध होतील, असे सांगितले. माजी आ. भजनदास वैद्य यांनी या प्रकल्पामुळे करटी, करटी खुर्द, पालडोंगरी, भुराटोला या गावाला पाण्याची समस्या भेडसावणार नसून येथील शेतकरी समृद्ध होतील, असे सांगितले.
याप्रसंगी मंचावर डॉ. वसंत भगत, सरपंच संगीता पुराम, भाजपा तालुका अध्यक्ष भाऊराव कठाणे, उमाकांत हारोडे, सलाम शेख, सरपंच सुधा घरजारे, पोलीस पाटील अरविंद चौरे, सुकचंद रहांगडाले, जितेंद्र रहांगडाले, तेजराम चव्हाण, पांडुरंग टेकाम, प्रकाश गौतम, योगेश्वर रहांगडाले, धीरज बरियेकर, निलेश बावनथडे, मुकेश पटले प्रामुख्याने उपस्थित होते.
संचालन डुलेश रहांगडाले यांनी केले. आभार घनशाम पारधी यांनी मानले. कार्यक्रमासाठी एच.ए. गायकवाड, एम.बी. कदम, कर्मचारी, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायत सदस्य यांनी सहकार्य केले.