सावंगी ग्रामस्थांनी पकडले रेतीमाफियांचे ट्रक

0
33

सडक अर्जुनी,दि.15 : तालुक्यातील सावंगी येथील रेतीघाटाचे लिलाव झाले नसतानाही या घाटातून रेतीमाफिया अवैधरित्या या घाटातून अवैधरित्या रेतीची उत्खनन करून प्रशासनाला लाखो रुपयांचा चुना लावण्यात येत आहे. ह्या रेतीमाफियांवर महसुल विभागाचे नियंत्रण नसल्याने १२ जानेवारी रोजी येथील ग्रामपंचायतीचे सरपंच शेरू पठानसहीत ग्रामस्थांनी अवैधरित्या रेतीची तस्करी करणार्‍या तीन ट्रॅक्टरांना पकडून सडक/अजुर्नीच्या तहसीलदाराच्या स्वाधीन करण्यात आले.
चुलबंद नदी सावंगी गावाच्या क्षेत्रातून प्रवाहित होत असून गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नद्यांना जावून मिळत असते. सावंगी रेतीघाटातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसुलही प्राप्त होतो. मात्र, मागील काही वषार्पासून या घाटातून लाखो रुपयांची रेती अवैधरित्या उत्खनन करून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावल्या जात आहे. परिणामी नदीचे पात्र वाढून वाहतुकीमुळे रस्त्यांना जागोजागी खड्डे पडले आहेत. मात्र, प्रशासनाकडून यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी करूनसुद्धा प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात न आल्याने शुक्रवार, १२ जानेवारी रोजी सकाळी सरपंच शेरू खाँपठानसह ग्रामस्थांनी ४ चार ट्रॅक्टर पकडले तर १ टॅक्ट्ररचालक ट्रॅक्टर घेवून फरार झाला.या घटनेची माहिती त्वरीत सडक/अर्जुनीचे तहसीलदार विठ्ठल परडीकर यांना देण्यात आली. दरम्यान तहसिलदार तात्काळ आपल्या अधिकार्‍यांसह घटनास्थळावर दाखल होवून ३ ट्रॅक्टर जप्त केले.