खासदार निधीतून रस्ता बांधकामाला सुरुवात

0
11

गोंदिया,दि.15ः-राष्ट्रवादी काँग्रेस गोंदिया शहराच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध असून खा. प्रफुल्ल पटेल यांच्या विकास निधीतून निर्मित शहरातील वार्ड क्र. २ मध्ये सिमेंट रस्त्याचे भूमीपूजन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अशोक सहारे हे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून हितेंद्र बिसेन, पुरणचंद कवास, युवराज बिसेन हे प्रामुख्याने उपस्थित होते. वार्ड क्रमांक २ मध्ये खा. प्रफुल्ल पटेल यांच्या निधीतून सिमेंट रस्ता तयार झाल्यामुळे नगरसेविका कुंदा पंचबुद्धे, हेमंत पंधरे, छोटू पंचबुद्धे, गुड्डू बिसेन, विजय मिर्शा, बाळा हलमारे, प्रकाशचंद भांडारकर, चमन टेंभरे, देवू भेंडारकर, निलेश कडव, वीरेंद्र सिंगनजुडे, प्रवीण मेंढे, चंदू टेंभरे, अभिनंदन कुकडे, बाळू पारधी, रवींद्र गलोले, राजू बिसेन यांनी खा. पटेल यांनी आभार मानले आहे.