राज्यातले भांडवलदारधाजिर्णे सरकारपासून सावध रहा-माणिकराव ठाकरे

0
8

गोंदिया-राज्यात भांडवलदारधार्जीणे सरकार आले असून आपणा सर्वांना आता गप्प बसून चालणार नाही.भारनियमन बंद करु,शेतकèयांना हमीभावापेक्षा अधिक भाव देऊ,काळा पैसा आणून प्रत्येकाच्या बँकेत १५ लाख रुपये जमा करु असे खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजपसेनेच्या सरकारने १०० दिवसात निवडणुकीत आश्वासने दिलेली एकही गोष्ट पुर्ण केली नाही.तर उलट राज्यातील उद्योग आणि पाणी गुजरातला पळविण्याचा काम करणारे 100 दिवसाचे घोषणाबाज सरकार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पद्रेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले.पुढे बोलताना म्हणाले की,काँगेसच्या काळात कमी भाव मिळत असल्यानेच शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा गवगवा करणाèया मोदी सरकारच्या आणि फडणवीस सरकारच्या सहा महिन्याच्या काळात ६०० हून अधिक शेतकèयांनी आत्महत्या केल्या आहेत.
गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित या मोच्र्याची सुरवात सर्कस मैदान येथून करण्यात आली.हा मोर्चा गांधी प्रतीमा,जयस्तंभ मार्ग फूलचूर नाका होत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.या मोच्र्यात हजारोच्या संख्येने जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते.मोच्र्याचे नेतृत्व आमदार गोपालदास अग्रवाल,जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे,माजी आमदार रामरतन राऊत,झामसिह बघेले,उषा मेंढे,प्रफुल अग्रवाल,पी.जी.कटरे,अमर वराडे,राधेलाल पटले,राजेश नंदागवळी,आशिष नागपूरे,छाया चव्हाण,योगेंद्र भगत,विशाल शेंडे,भरतभाऊ बहेकार,अशोक लंजे,नामदेव किरसान,हिरालाल चव्हाण,देवेंद्र तिवारी,मनिष मेश्राम,धनलाल ठाकरे,रजनी नागपूरे आदीनी केले.
या मोच्र्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रामुुख्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री नितीन राऊत,विजय वड्डेटीवार,सावनेरचे आमदार सुनिल केदार,साकोलीचे माजी आमदार सेवक वाघाये आदी काँग्रेस नेते प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की,धानाला तीन हजार रुपयाचे हमीभावाची मागणी करणारे सत्तेत आले असता गप्प बसले याचा जाब विचारण्याची वेळ आल्याचेही ते म्हणाले.माजी मंत्री नितीन राऊत यांनीही फडणवीस सरकारवर हल्ला चढवित अन्नदाता शेतकèयाला आत्महत्येच्या खाईत लोळणारे सरकार अशी टिका केली.माजी आमदार सेवक वाघाये,सुनिल केदार यांनीही विचार व्यक्त केले.आमदार गोपालदास अग्रवाल यांनी राज्यातील भाजपसेना सरकारमूळे धानउत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचा आरोप करीत धानाच्या मुद्याला घेऊन काँग्रेस सरकारच्या काळात आंदोलन करणारे भाजप नेते आता मात्र मूग गिळून गप्प बसल्याचा आरोप केला.3 महिन्यात सहा वेळा एक्साईज ड्युटी वाढविणारे हे सरकार कामगार विरोधी धोरण राबविणारे आहे.आम्ही सत्तेत असतानाही धानासाठी आवाज उठवून बोनस मिळवून द्यायचो परंतु आताचे सत्ताधारी गप्प बसून शेतकर्याची पिळवणूक करीत आहेत असेही म्हणाले.मोच्यार्नंतर जिल्हाधिकारी अमित सैनी यांना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन सादर केले.संचालन पी.जी.कटरे यानी केले तर आभार राजेश नंदागवळी यांनी मानले.