काँग्रेसच्या मोच्यार्ला जिल्हाप्रशासन घाबरले

0
8

गोंदिया-गेली पंधरा वर्षे राज्याच्या सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला कधीही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज आपल्या सरकारविरोधात पडली नव्हती.परंतु २०१४ च्या निवडणुकीत सपाटून मार खालेल्या काँग्रेसला पराभवाचा स्वाद चाखावा लागला.आणि सत्तेत भारतीय जनता पक्ष शिवसेनेला बसण्याची संधी मिळाली.गेली पंधरा वर्षे विरोधी पक्षाची भूमिका निभावणारा पक्ष सत्तेत बसला.परंतु ज्यांना सत्तेची सवय होती त्यांना विरोधात बसावे लागले.अशा या विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्यावतीने आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोच्र्याचे आयोजन करण्यात आले होते.या मोच्र्याला विरोधी पक्ष नेत्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हजेरी लावणार म्हटल्यावर पोलीस बंदोबस्तही तशाच राहणार यात शंका नव्हती.परंतु आजपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर एवढे मोर्चे काढण्यात आले,परंतु कधीही जिल्हाधिकारी कार्यालयाचे दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात येत नव्हते.ते प्रवेशद्वार मात्र आज मोर्चा येण्याआधीपासूनच पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले होते.या चित्रावरून जिल्हाप्रशासन काँग्रेसच्या मोच्र्यापासून चांगलेच घाबरले होते हे मात्र पोलीस बंदोबस्तावरून स्पष्ट बघावयास मिळाले.जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी येणाèया आगतुकांची वाहने सुध्दा दूर लांब उभी करायला पोलीस सांगत असल्याचे चित्र दिसून आले.याप्रकारामुळे मात्र आगतुकांना त्रास सहन करावा लागला पण पोलिसांना एकदिवस आपल्या वर्दीचा दरारा या आंदोलनामुळे प्रवेशद्वारावर दाखविण्याची संधी मिळाली यात शंका नाही.