राज्य व केंद्रातले सरकार अदानी अंबानीचे-विरोधी पक्षनेते विखे पाटील

0
10

कांग्रेसच्या मोच्र्यात सरकारविरोधी आक्रोश
काँग्रेसच्या राज्यव्यापी मोच्र्र्याची सुरवात गोंदियातून
गोंदियातील मोच्र्याला काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची हजेरी
गोंदिया-लोकांना खोटे आश्वासने देऊन आणि दिशाभूल करीत सत्तेत सहभागी झालेली केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार ही शेतकèयांवर अन्याय अत्याचार करणारी सरकार आहे.तर लोकसभेच्या निवडणुकीत ज्या अदानी व अंबानीने भाजपला पैसा दिला त्यांच्या हितासाठी काम करणारी सरकारे देशात असल्याचा आरोप महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
ते गोंदिया येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आवाहनावर आयोजित करण्यात आलेल्या गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मोच्र्याला मार्गदर्शन करतांना बोलत होते.काँग्रेसच्यावतीने राज्यातील पहिला मोर्चा गोंदियात काढण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.पुढे बोलतांना विखे पाटील म्हणाले की,राज्यातील भाजप सेनेच्या सरकारने लोकांना खोटे आश्वासने दिले धानाला किमान आधारभूत किमंत देण्याचे आश्वासन दिले,परंतु काँग्रेससरकारने दिलेल्या हमीभावापेक्षाही कमी भाव दिल्याने आज धान उत्पादक शेतकèयांवर संकट कोसळल्याचे म्हणाले.सोयाबीनला ३८०० रुपयाचा भाव देण्याची घोषणा निवडणुकीत करणारे देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर मात्र २५०० रुपये भाव सुध्दा देऊ शकले नसल्याचे म्हणाले.नदीकाठावर उद्योग उभारल्यास नदीपात्रातील पाणी शेती व पिण्यासाठीचा प्रश्न उदभवू शकतो हे हेरून आम्ही प्राधीकरण तयार केले होते.परंतु भाजपसरकारने आता उद्योगपत्तीसमोर लोटांगण घालत नदीकाठावरच उद्योगस्थापन करण्यास मंजुरी दिल्याने भविष्यात आमच्या शेतकèयाच्या शेतीलाच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होणार असल्याचे सांगत राज्यातील भाजप सेनेचे १०० दिवसाचे सरकार हे नापास सरकार असल्याचा टोला सुध्दा विखे पाटील यांनी हाणला.