काँग्रेसचा महामार्गावर रास्ता रोको

0
11

भंडारा : लोकसभा व विधानसभा निवडणूकीत लोकांना भुलविणारी खोटी आश्‍वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेनाच्या केंद्र व राज्य सरकारने जनहित घेण्याचा सपाटा लावला आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने भंडारा येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
भाजपा सरकारने शेतकरी विरोधी धोरण, शेतकर्‍यांना कर्ज माफी निवडणुकीत दिलेले आश्‍वासन पाळण्यात सरकारचा नकार, डिझेल व पेट्रोलचे दर नियमानुसार ५0 टक्के कमी न करता केंद्र सरकारने जनतेची लुट करीत आहे.
भूमी अधिग्रहण कायदा, अन्न सुरक्षा अभियानातून केशरी कार्ड धारकांना वंचित ठेवून १ कोटी ७७ लाख जनतेची उपासमार, घरगुती विज, छोटे उद्योग पॉवरलुम यांच्या सवलतीत कपात करुन जनतेवर भुर्दंड यांच्या निषेधार्थ राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केले.
यावेळी मधुकर लिचडे, प्रेमसागर गणविर, सचिन घनमारे, राजकपूर राऊत, राजकुमार मेo्राम, सिमा भुरे, स्वाती बोबले, मिरा उरकुडकर, अजय गडकरी, मार्तंड भेंडारकर, पक्षनेता शमीम शेख, राजू सयाम, सुनिता कापगते, उमराव आठोडे, चोलराम गायधने, गणेश निमजे, धनराज मुलकलवार, प्यारेलाल वाघमारे, मुकुंद साखरकर, शर्मील बोदेले, मंगेश हुमणे, राजु सुर्यवंशी, सुधा निंबार्ते, प्रदिप मासुरकर, आनंद तिरपुडे, अंकुश वंजारी, निखिल कुंभलकर, पराग खोब्रागडे, प्रकाश गाढवे, प्रशांत सरोजकर, संतोष नेवारे, राकेश कडबे, सेकवदास कोसरे, भारती लिमजे, शमीम पठाण, अखीला शेख, कविता चाचेरे, मनोहर राखडे, ललित खुणे, प्रेमदास वणवे, अनिल किरणापुरे आदी उपस्थित होते.