देवरी येथे शेतकरी प्रशिक्षण

0
12

देवरी- राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत देवरी येथे शेतकऱ्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
स्थानिक अग्रसेन भवन येथे आयोजित या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शक म्हणून साकोलीच्या कृषी संशोधन केंद्राचे मुख्य भात पैदासकार डॉ. शामकुवर, हिवरा येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक नवलाखे, कृषी विज्ञान केंद्र साकोलीचे कीटक शास्त्रज्ञ चौधरी, आणि देवरीचे उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी देवरी उपविभागातील सालेकसा, आमगाव, देवरी आणि सडक अर्जूनी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन तंत्र अधिकारी लखन बनसोड यांनी केले. उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक सुरेश धांडे यांनी मानले. शिबिराचे यशस्वितेसाठी पर्यवेक्षक प्रकाश मेश्राम, मंडळ अधिकारी संजय रामटेके, वैशाली पटले, सुनीता जाधव यांनी सहकार्य केले.