पदमपूर येथे ‘एक शाम शहिदों के नाम’ उद्या

0
14
शहीद कुटुंबियांचा सत्कार: एकल व समूह नृत्य स्पर्धा
आमगाव,दि.24 : यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था, उडाण बहुउद्देशिय विकास संस्था व भवभूती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी रोजी पदमपूर येथील राष्टÑसंत तुकडोजी चौकात ‘एक शाम शहिदों के नाम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभक्ती गीतांवर समूह व एकल नृत्य स्पर्धा घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून तसेच नागपूर, भंडारा या शहारातील स्पर्धक या स्पर्धत सहभागी होणार आहेत.
यावेळी देशसेवा करणाºया जवाणांचा तसेच देशसेवा करतांना वीर मरण पत्करणाºया शहीद कुटुंबियांचा सत्कार दुपारी ३ वाजता विशेष समाज कल्याण न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, मुकाअ आर. राजा दयानिधी, डॉ. माधुरी नासरे, डॉ. पुष्पराज गिरी शंकराचार्य, वज्रागिरी शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
समूह व एकल नृत्य स्पर्धेचे उदघाटन आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी तहसीलदार साहेबराव राठोड, अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक शशीकांत दसुरकर, खंडविकास अधिकारी एस.एम.पांडे उपस्थित राहणार आहेत. बक्षीस वितरण जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, त्रिलोक शेंडे, पं.स. उपसभापती जयप्रकाश शिवणकर, प्रा. सुभाष आकरे, अभियंता गोवर्धन बिसेन, अंजली जांभूळकर, अनिल पाऊलझगडे व इतरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. समूह नृत्याला प्रथम पुरस्कार ७००१, द्वितीय ५००१,  तृतीय ३००१ रूपये तसेच एकल नृत्याला प्रथम ५००१, द्वितीय ३००१ व तृतीय पुरस्कार म्हणून २००१ रूपये देण्यात येणार आहे. जिल्हावासीयांनी  अधिक संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.