शिक्षित मुलगी सुरक्षित भविष्य-गीतकार प्रसून जोशी

0
17

स्व.मनोहरभाई पटेल स्मृती स्वर्णपदक वितरण सोहळा उत्साहात
गोंदिया-शिक्षण आजच्या काळात प्रत्येकाची गरज झाली असून जोपर्यंत घरातील मुलगी शिक्षित होणार नाही,तोपर्यंत सुरक्षित भविष्य तयार होऊ शकत नाही.त्यामुळे प्रत्येकाने मुलीला शिक्षित करण्यासाठी पुढाकार घेण्याची खरी गरज असल्याचे विचार प्रसिध्द लेखक,कवी व गीतकार प्रसून जोशी यांनी व्यक्त केले.
जोशी पुढे म्हणाले की,महाराष्ट्राने शिक्षणात खुप प्रगती केली आहे,परंतु महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर ज्याठिकाणी शिक्षणाच्या सोयी आणि सुविधा नव्हत्या अशा गोंदिया भंडारा जिल्ह्यात स्वनामधन्य नेते मनोहरभाई पटेलांनी दुरदृष्टी ठेऊन शिक्षणाची उघडललेली दारे या भागाच्या शैक्षणिक क्रांतीसाठी महत्वाची ठरली आहेत.राज्यात मोठ्यासंख्येने शिक्षणसंस्था व महाविद्यालये मी बघितले परंतु आज गोंदिया शिक्षण संस्थेचा हा परिसर बघून अशी संस्थाच काय असा परिसर सुध्दा देशातल्या कुठल्याच शहरात नसल्याचा उल्लेख करीत संदुर हिरवेगार आणि स्वच्छ परिसरासोबतच शहर सुध्दा सुंदर असल्याचे म्हणाले.आपले आईवडील जे स्वप्न दाखवितात त्या स्वप्नाना आपले स्वप्न स्विकारून आपले ध्येय गाठल्यास यश प्राप्ती नक्की होते.आज ज्या १६ गु‹णवंत विद्याथ्र्यांसह इतरांचा सत्कार आपण केलात यात मुलींची संख्या ही सर्वाधिक असल्याचा आनंद जसा मला होत आहे,तसेच मुलीच्या शिक्षणाप्रती सर्वांनी आग्रही राहणे सुध्दा तेवढेच गरजेचे आहे.घरातील महिला शिक्षित राहीली तर घरातील वातावरण आणि पिढीवर सुस्कृंत असे परिणाम पडतात,त्याकरीता मुलगी जोपर्यंत शिक्षित होणार नाही,तोपर्यंत भविष्य सुरक्षित राहू शकत नाही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हणाले.
ते आज(दि.९) येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित स्व.मनोहरभाई पटेल यांच्या १०९ व्या जयंती कार्यक्रमाच प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. सुवर्णपदक वितरण समारंभाचे उद््घाटन सुप्रसिद्ध क्रिकेटर भारतरत्न खासदार सचिन तेंडूलकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले,त्यावेळी बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चित्रपट निर्देशक राजकुमार हिरानी, अंजली तेंडुलकर ,कॅप्टन मंजिरी हिराणी,आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर,आमदार प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी राज्यमंत्री विलासराव शृंगारपवार, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आ. रामरतन राऊत, माजी आ. अनिल बावनकर, माजी आ. मधूकर कुकडे, मनोहरभाई पटेल अकादमीचे अध्यक्ष वर्षा पटेल,माजी आमदार हरीहरभाई पटेल,पुर्णा पटेल,गजाला शर्मा,विक्रम साठे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात स्व.मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्र्यापण व दीपप्रज्वलन करुन करण्यात आली.मान्यवर पाहुण्यांचे प्रफुल पटेलांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.नंतर भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर व मान्यवर अतिथींच्या हस्ते नेहा झनेश पशिने, पवन रूमेश्वर रहांगडाले, आकाश नितीन कोतवाल, दीपिका दामोधर वाघमारे, मुस्कान महेश अग्रवाल, प्रशांत चैतराम पारधी, रेणू अशोककुमार अग्रवाल, पिंकी महेशकुमार सचदेव, विदेश राजकुमार रामटेके, रौनक विजयकुमार वेगड, क्षितिजा नरेंद्र राजाभोज, पूनम भोजराज शहारे, चेतना जवाहर तर्जुले, मंगेश चरणदास कोचे, तृप्ती नुरदेव चौधरी, चेतन प्रमोद अग्रवाल यांचा स्वर्णपदक व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना चित्रपट निर्माते राजकुमार हिराणी यांनी आपल्या बालवयातील आठवणींना उजाळा देत ३०-३५ वर्षांनतर गोंदियात येण्याया योग प्रफुलभाईमूळे आल्याचा उल्लेख करीत आपल्याला थ्री इडियट चित्रपट निर्मितीच्यावेळी गोंदियात असे सुंदर महाविद्यालय असल्याची जाणिव असती तर आपण त्या चित्रपटाची शुटींग बंगलोर एैवजी इथेच केली असती असे सांगत भविष्यात चित्रपट तयार करतांना गोंदियाच्या या शैक्षणिक संकुल परिसराचा विचार करण्याचे संकेत दिले.थ्री इडियटमध्ये आपण आपल्या आयुष्यातील काही क्षण उतरविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत आपणही विज्ञानाचे विद्यार्थी होतो,इंजिनियर व्हायची इच्छा होती.परंतु कमी गुण मिळाल्याने वाणिज्य शाखेकडे जावे लागले.परंतु तिथे जमत नसल्याचे वडींलाना सांगितले आणि वडिलांनी आपल्यासोबत मला घेतले तेव्हा कुठे आपण मोकळे झाल्याचा आनंद त्यावेळी झाला होता असा उल्लेख करीत विद्यार्थी जिवनात प्रत्येकांनी आनंदाचा लाभ अवश्य घ्यावे असे म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात खासदार प्रफुल पटेल म्हणाले की, स्व.मनोहरभार्इंनी भंडारा गोंदिया जिल्ह्याला आपली कर्मभूमी मानली. त्यामुळे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मला मिळाली. दूरदृष्टी आणि परिश्रमाच्या जोरावर मनोहरभार्इंनी स्वतः अल्पशिक्षित राहून येथे शिक्षणाची दारे उघडली. गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी आपली सकारात्मक भूमिका त्यांनी त्याकाळी वापरली. त्याकाळी एकच हायस्कूल याठिकाणी असताना शिक्षणासाठी होणारी अडचण स्वतः कमी शिकलेले असतानाही त्यांच्या लक्षात आली. एकाच दिवशी २२ हायस्कूल्सची निर्मिती करून भंडारा गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाची दारे उघडली.
समाजसेवेचे व्रत स्वीकारून शिक्षणात कोणी माघारु नये, म्हणून शिक्षणाची गंगा आणली. मनोहरभार्इंनी उघडलेल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज विविध शाखेत १ लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या भागाच्या सर्वांगीण विकास साधायचा असून आपल्या सर्वांच्या सहकार्याची सुध्दा गरज असल्याचे पटेल म्हणाले.१० हजार कोटी रुपयाच्या खर्चातून गोंदिया भंडारा जिल्ह्यात qसचनाच्या सोयी करण्यात येत असून भविष्यात राज्यात सर्वांत जास्त qसचन क्षमता असलेला जिल्हा म्हणून गोंदिया भंडाराची ओळख होईल, असेही सांगत उद्योग धंद्याची या भागात गरज असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल,जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर,माजी मंत्री अनिल देशमुख यांचीही भाषणे झाली.कार्यक्रमाचे संचालन आमदार राजेंद्र जैन यांनी केले.आभार नरेश माहेश्वरी यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता मनोहरभाई पटेल सैनिक शाळेच्या विद्याथ्र्यांनी सादर केलेल्या राष्ट्रगीतांनी करण्यात आली.