आज गोरेगाव भाजपा मंडळची बैठक

0
10
गोरेगाव, दि.१२ : जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा १७ फेबु्वारी रोजी असल्यामुळे भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांची गोरेगाव भाजपा मंडळाची बैठक स्थानिक महाजन नगर येथील मोरेश्वर रहांगडाले यांच्या घरी १२ फेबु्रवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पदाधिकारी व सक्रीय कार्यकत्र्यांनी दुपारी १२ वाजता वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत यांनी केले आहे.
या बैठकीला भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, पालकमंत्री ना. राजकुमार बडोले, भाजपा तालुका महामंत्री संजय बारेवार, व्यंकट कटरे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले व जिल्हाध्यक्ष हेमंत पटले मार्गदर्शन करणार आहे. कार्यक्रमांचे नियोजन करुन पदाधिकारी नियोजित कामांबाबत माहिती देण्यात येणार आहे.