फुलचूरच्या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा

0
29
गोंदिया,दि.१२ :जवळील फुलचूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात २९ जानेवारी रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी अशोक चन्ने होते. यावेळी सरपंच लक्ष्मीबाई कटरे, उपसरपंच आशादेवी मेश्राम, पं.स.सदस्य स्रेहाताई गौतम, तंटामुक्ती समिती अध्यक्ष शिवनारायण नागपुरे, माजी जि.प.सदस्य राजेश चतूर, जमीनदार विजेंद्र नागपुरे, सेवकराम बंसोड, माजी सरपंच गजानन पोंगळे, सेवा सहकारी संस्था अध्यक्ष सुभानराव रहांगडाले, गजानन बघेले, गोवर्धन नागपुरे, दारूबंदी समिती अध्यक्ष कल्पनाताई कुंभरे, ग्रा.पं. सदस्य मुकेश लिल्हारे, महेशकुमार अंबुले, देवचंद बिसेन, दुर्गाप्रसाद नागपुरे, गुणराज ठाकरे, उमेश पांजरे, सुशिलाबाई नेवारे, सुनीताबाई बघेले, सुनीताबाई सव्वालाखे, सत्यभामाबाई कवास, गीताताई देवगडे, योगी हिरापुरे, रंजू सुरजजोशी, रिता बैस, लता बैस, उर्मिला नागपुरे, रेखा नागपुरे, जमुना लिल्हारे, सुंदर पटले, उर्मिलाबाई रहमतकर, माजी पं.स.सदस्य पुस्तकलाबाई पटले, धीरसिंग लिल्हारे, सुकचंद येळे, हंसराज बिसेन, राजकुमार हरिणखेडे, दिनेशकुमार गौतम, ताराचंद नागपुरे, गोवर्धन नागपुरे प्रामुख्याने उपस्थित होते.
सभेत हळदीकुंकू कार्यक्रम, राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजना, विविध विकास कामे, पंतप्रधान आवास योजना, प्लास्टीक बंदी, स्त्रीभ्रृण हत्या, शंभर टक्के शौचालयाचा वापर, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, दारूबंदी, अतिक्रमण, १४ व्या वित्त आयोगाचे नियोजन, पाणीटंचाई व पाण्याचे नियोजन आदी विषयावर चर्चा करण्यात आली. आभार ग्रामविकास अधिकारी टी.डी.बिसेन यांनी केले. सभेला १९४ ग्रामसदस्य उपस्थित होते.