संत समेलनाच्या मंचावर संत नव्हे भाजप नेत्यांचीच गर्दी

0
15

संत चोखोबा नगर,दि.16ः अर्जुनी मोरगाव येथीलजिल्हा परिषद हायस्कुलच्या पटांगणावर आयोजित 7 व्या संत समेलनाच्या दुसार्या दिवशी मुख्यमंत्र्याच्या हस्ते संताचे सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.त्यासाठी भारतीय जनता पक्षाने गावखेड्यातूून वाहनाद्वारे नागरिकांची गर्दी मुख्यमंत्र्यांना दाखविण्यासाठी करतानांच नियोजनाकडे मात्र लक्ष दिले नाही.सकाळच्या पाळीत शाळा करुन शांळाना लगेच सुटी देण्यात आली.तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील रोजगार हमीच्या कामांनाही सुट्टी देत त्या कामावरील मजुरांना संत साहित्य समेलनाता आणण्याचा केलेला खटाटोप हे या समेलनाचे यश समजावे की अपयश याचा सुज्ञ नागरिकांनी विचार करण्याची गरज आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्री असल्याने पत्रकाराचीही हजेरी राहणार  हे आयोजकांना माहित असतानाही पत्रकारासांठी बसण्याची योग्य व्यवस्था करण्यात न आल्याने पत्रकारांना ताटकळत रहावे लागले.शाासकीय अधिकारी सुध्दा पत्रकारांच्या बसण्याची सोय करु शकले नाही.तर आयोजक समितीमधील एका महिला पदाधिकायाने तर चक्क उभ्या असलेल््या पत्रकारासांठी खुर्च्या नेणार्या व्यक्तीस थांबवून कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजन असल्याचे दाखविले.तर मंचावर संतापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या नेेत्यांनी गर्दी केल्याने हे संत समेलनांचे मंच कि भाजपच्या कार्यक्रमाचेे मंच अशी चित्र होती.