मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्यपाल महारांजाना संत चोखोबा पुरस्कार प्रदान

0
11
संत चोखोबा नगरी,(खेमेंद्र कटरे) दि.१६ येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात आयोजित ७ व्या अखिल भारतीय संत साहित्य समेलनाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र  फडणवीस यांनी हजेरी लावली.सत्काराधी त्यांचे विठ्ठल पाटील व राजकुमार बडोले यांनी स्वागत केले. मुख्यमंत्र्याच्या हस्ते वारकरी साहित्य वारकरी संप्रदायाच्या विशेष सेवेसाठी जीवनगौरव पुरस्कार संत गाडगेमहाराज मिशनला देण्यात आले हा पुरस्कार बापूसाहेब देशमुख यांनी स्विकारला.तसेच हभप बाबामहाराज राशनकर पंढरपूर व हभप माधवमहाराज शिवणीकर भक्त पुंडलीक फड प्रमुख यांना प्रत्येकी 1 लाख प्रदान करण्यात आले.प्रशांत महाराज ठाकरे दुचाकीची चाबी देत यांचाही सत्कार करण्यात आला.महादेवबुवा शहाबाजक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पहिल्यांदा देण्यात आलेला डॉं बाबासाहेब आबेंडकर समता प्रतिष्ठान व सामाजिक न्याय विभाग यांच्यावतीने सुरू करण्यात आलेला संत चोखामेळा पुरस्कार सप्तखंजेरीवादक हभप सत्यपाल महाराजांना रोख ५१ हजार व सन्मान चिन्ह फडणविस यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप रामकृष्ण लहवितकर हे होते. स्वागताध्यक्ष म्हणून  सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले,आमदार विजय रहागंडाले,आमदार परिणय फुके,संजय पुराम, जि.प. उपाध्यक्ष अल्ताफ हमीद,जि.प.सभापती विश्वजीत डोंगरे, जि.प.सभापती शैलजा सोनवाने, पं.स.सभापती अरविंद शिवणकर,माजी खासदार खुशाल बोपचे,माजी आमदार हेमंत पटले,खोमेश रहागंडाले,उमाकांत ढेंगे,प्रकाश गहाणे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील,हभप नरहरी चौधरी,सत्यपाल महाराज,दिनेश वाघमारे,जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे,सीईओ दयानिधी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते