पशुसंवर्धन मंत्र्यांनी साधला शेतकर्‍यांशी संवाद

0
13

अर्जुनी मोरगाव,दि.20ःतालुक्यातील कुंभीटोला व बाराभाटी या गावाला पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी १५ फेब्रुवारीला कुंभीटोला व बाराभाटी या गावाला भेट देऊन आदिवासी उपाययोजना, विशेष घटक योजना तसेच नाविण्यपुर्ण योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दिलेल्या संकरीत गायी तसेच कुक्कुट पक्षी गृहाची पाहणी करून लाभार्थ्यांशी हितगुज साधले.
भेटी दरम्यान त्यांनी गोपालकांच्या व कुक्कुट व्यवसाय करणार्‍या लाभार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. अडचणीचे लवकरच निराकरण करण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्यात २ संकरीत गायी व म्हशी वाटप करणे ही योजना सन २0१८-१९ पासून सर्व घटकांसाठी राबविण्यात येणार आहे. तसेच राज्यात येणार्‍या काळात जलयुक्त शिवार योजनेच्या धर्तीवर चारायुक्त शिवार योजनेच संकल्पना राबवून जनावरांच्या खाद्यावरील खर्च कमी करण्याचा मानस असल्याचा सांगितले. भेटी दरम्यान मंत्री जानकर यांच्या सोबत डॉ. अजयकुमार शहारे, डॉ. राजेश वासनिक, डॉ. विनेश गोंडाने, डॉ. लाला बारापात्रे, डॉ. प्रदीप बावने, डॉ. दिपक मंदीकूंटावर, विकास बडोले, चामेश्‍वर गहाणे उपस्थित होते.