जोडेपल्ली गावालगत साडेसहा लाखाचा वनोपज जप्त

0
13

गडचिरोली(अशोक दुर्गम),दि.२०ः-जिल्ह्यातील सिरोंचा वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या जोडेपल्ली गावालगत वनविभागाच्या गस्तीपथकाला सुमारेल ६ लाख ५० हजार रुपयाचा वनोजप बैलबंडीतून वाहतूक करीत असतांना आढळून आले.उपवनसरंक्षक डॉ.तुषार चव्हाण,वनपरिक्षेत्राधिकारी वि.वा.नरखेडकर यांना मिळालेल्या गुप्तमाहितीच्या आधारे रंगधामपेठा ते qचतरवेला परिसरात २० फेबुवारीच्या रात्री गस्त घालत असताना मध्यरात्री १.४५ वाजता बैलबंडीमध्ये सागाची लाकडे भरून नेतांना वनतस्कर आढळून येताच त्यांचा पाठलाग करुन जोडेपल्ली गावालगत त्यांना घेरण्यात आले.त्यापुर्वी वनतस्करांनी वनकर्मचाèयावर दगडफेक केला असता वनकर्मचाèयांनीही हवेत गोळीबार केला तेव्हा बैलबंडीसोडून वनतस्कर अंधाराचा लाभ घेत फरार झाले.त्यातच पाठलाग करीत असताना एक वनतस्कर खाली पडल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याचे नाव तिरूपती नारायण सदनपू(३६,रा.राघवरावनगर) असे आहे.यावेळी ७ बंडी,९ बैल व २४ नग सागवान लठ्टे ताब्यात घेण्यात आले.२ लाख १६ किमतीचे सागवान,३ लाख ६० हजाराचे बैल व ७० हजार किमतीची बैलबंडी अशा ६ लाख ४६ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून सिरोंचाचे वनपरिक्षेत्राधिकारी वि.वा.नरखेडकर हे तपास करीत आहेत.