24.2 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home विदर्भ रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी 

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी 

0
20
तिरोडा,दि.23ः- तालुक्यातील मांडवी येथे शेतात लाखोरी पिकाची देखभाल करण्यास गेलेल्या शेतकºयावर रानडुकराने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना  २२ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील मांडवी येथे घडली. जखमी शेतकºयाचे रामदास सुखराम नागपुरे (६३) असे नाव आहे.  रामदास सुखराम नागपुरे हे आपल्या शेतात लाखोरी पिकाची देखभाल करण्यास गेले असता, अचानक मागून आलेल्या रानडुकराचे कळपातील एका मोठ्या रानडुकराने त्यांचेवर हल्ला करून जबर जखमी केले. दरम्यान, आसपासचे शेतकरी धावून आले व त्वरित उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे आणून दाखल केले आहे.  सदर शेतकºयावर उपचार सुरु असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान वनविभागाने त्वरित जखमी शेतकºयास शासकीय मदत देण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.