शहराच्या अतिक्रमण मोहिमेला समन्वयाचा फटका

0
6
नगर परिषदेची टाळाटाळ, लोकप्रतिनिधींची मतांवर नजर,पालकमंत्र्यांच्या निर्देशाला केराची टोपली
गोंदिया,दि.23ः- गेल्या अनेक वर्षापासून गोंदिया शहराच्या मास्टर प्लॉनचे घोडे अडले आहे. त्यातच भुमीअभिलेख व नगर परिषद कर्मचाNयांच्या समन्वयामुळे अतिक्रमण हटावचे कागदी घोडे कागदपत्र व पत्रव्यवहारात अडकल्याचे चित्र समोर आहे. त्यामुळे शहर अतिक्रमणमुक्त होणार किंवा नाही. यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
येथील नगर परिषद क्षेत्रातंर्गत मोठ्या प्रमाणात रस्ते आणि नझुलच्या जागेवर तसेच शहरातील पुâटपाथ व सांडपाणी वाहून जाणार्या नाल्यांवर व्यापार्यांसह अनेकांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.
ही समस्या सोडविण्याच्यादृष्टीने अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याचा संकल्प नगर परिषदेने घेतला होता. त्यादृष्टीने चार-पाच महिन्यांआधी मोहिम सुरूही करण्यात आली. पंरंतु व्यापारी व नागरिकांच्या वाढत्या विरोधामुळे मार्विंâग व मोजणी करूनच अतिक्रमण अतिक्रमण हटविण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला. त्यातच पालकमंत्र्यानीही जिल्हधिकारी कार्यालयात अढावा बैठक घेत गोंदिया शहराला अतिक्रमणमुक्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नगर परिषदेच्या पत्रावर भूमीअभिलेख कार्यालयाने  शङरातील जयस्तंभ चौक ते गांधी प्रतिमा,पाल चौक ते गायत्री मंदिर या मुख्य रस्त्यांची मोजणी करून मार्विंâग केली. मोजणीनंतर लगेच नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहिम राबवायला हवी होती. मात्र, त्याकडे कानाडोळा केल्याने  आजही अतिक्रमण जैसे थे आहे. तर लोकप्रतिनिधींनी निवडणुकांपर्यंत अतिक्रमण हटवू नका, मतदार दुरावतील अशी भुमिका घेतली असली तरी, या सर्व प्रकरणात नगर परिषद,महसुल विभाग, भुमी अभिलेख विभाग व पोलीस विभाग यांच्यात पाहिजो तो समन्वय नसल्याने व काही तांत्रिक कारणांमुळे ही मोहिम थंडबस्त्यात गेली आहे.
विशेष म्हणजे भुमी अभिलेख विभागाने त्यांचेकडे उपलब्ध असलेल्या शासकीय रेकार्डनुसार मोजणी व मार्विंâगचे काम करून नगर परिषदेला कळविले. परंतु नगर परिषदेने त्याकडे लक्ष दिले नसल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी, गोंदिया शहर,गोंदिया खुर्द,गोंदिया (बु.),कटंगीकला,नंगपुरा,मुर्री,कुडवा व पिंडकेपार येथील सिटी सव्र्हे न झाल्याने काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. येथील शासकीय रेकॉर्ड ब्रिटीशकालीन असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. तर काही जागेची नोंद नकाशात नसल्याने  अधिकांश चर्तुसीमा भुमीअभिलेख विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे किती जागेवर अतिक्रमण झाले आहे. हे निश्चित कळत नाही. शहरातील मध्यभाग नझुलच्या रेकॉर्डमध्ये असून  त्या भागात अनेकांना पट्टे वितरीत करण्यात आले आहेत. आणि त्यावर अनेकांचे घरे आहेत. जोपर्यंत  सिटी सव्र्हे शहराचा होणार नाही. तोपर्यंत भुमीअभिलेखात दुरूस्ती होवून अतिक्रमित जागेचा शोध लागणार नाही. त्यासाठी सिटी सव्र्हेची गरज आहे.
भुमीअभिलेख विभागाने  कुडवा चौक, गायत्री मंदिर ते पाल चौक या मार्गाच्या मार्विंâगचे काम पुर्ण केले असून नगर परिषदेने रस्त्यांच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. मात्र, या रस्त्याच्या भागात असलेल्या अनेक भुखंडधारकांच्या रेकॉर्डमध्ये त्रृत्या असल्याने  पाहिजे ती कारवाई नगर परिषदेच्यावतीने वेळेवर होवू शकली नाही. त्याचप्रमाणे, जयस्तंभ चौक ते गांधी प्रतिमा या मार्गावर रस्ता आणि शासकीय जागेच्यामध्ये अनेकांनी बांधकाम करून दुकाने थाटली आहेत. ती दुकाने अतिक्रमित असून त्यांच्याकडे ही जागा आपल्या मालकीच्या असल्याचे उपलब्ध नसल्याचे भुमीअभिलेखच्या रेकॉडनुसार नसल्याची माहिती भुमीअभिलेख विभागाचे उपअधिक्षक एस.एच.पवार यांनी दिली.