ओबीसी संघर्ष कृती समितीची बैठकही उद्या आमगावात
आमगाव,दि.२३ः-छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जंयती उत्सव समिती आमगावच्यावतीने उद्या शनिवार २४ फेबुवारीला दुपारी १२ शिवजन्मोत्सवानिमित्ताने परिसंवादाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आयोजित करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे प्रा . डॉ जावेद पाशा यांच्या हस्ते होणार आहे.मार्गदर्शक म्हणून प्रा.प्रेमकूमार बोके अमरावती,अनिल भुसारी मराठा सेवा संघ अध्यक्ष भंडारा व दिपक बहेकार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सालेकसा उपस्थित राहणार आहेत.यावेळी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा.बी.एम.करमकर,ओबीसी संघर्ष कृती समितीचे उपाध्यक्ष काशिराम हुकरे,उपसभापती जयप्रकाश शिवणकर,भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष भरत वाघमारे,कुणबी सेवा समिती उपाध्यक्ष प्रीतम गायधने,मदनला बहेकार,आनंद बसोंड,लिलाबाई कठाणे,शिलाबाई हजारे,अरुणाबाहे बहेकार,अनिता तरोणे,संगिता फुंडे,प्रमोद नागपूरे,संजय बोहरे हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर शिवणकर राहणार आहेत. तसेच ओबीसी संघर्ष कृती समितीच्या बैठकीचेही आयोजन करण्यात आले असून ओबीसी बंधू भगिनींनी दुपारी १२ मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समीती अध्यक्ष क्रांती(राजूभाऊ)ब्राम्हणकर,उपा ध्यक्ष लीलाधर गिरेपूंजे,आर.सी.बोरकर,सचिव हरीशराव ब्राम्हणकर,डी.यू.बीसेन,कोषाध् यक्ष कृष्णा बहेकार,संघटक प्यारेलाल जांभूळकर,राजेश शिवनकर,प्रशांत गायधने,धीरज ठाकरे,प्रभू बोहरे,रितेश चौधरी,सूनील ब्राम्हणकर,शरदराव फुंडे,राजू चूटे,प्रफूल मेंढे,दुर्गाप्रसाद वंजारी,मुश्ताक शेख,भास्कर येरने,योगेश रामटेके,नरेंद्र शिवनकर,राकेश शेंडे,तीरथ येटरे,अश्फाक शेख यांच्यासह बहूजन समाजातील सर्व फूले शाहू आंबेडकरवादी वैचारिक संघटानांच्यावतीने करण्यात आले आहे.





