27 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ सौंदड येथील पाटबंधारे शाखा कार्यालय वाèयावर

सौंदड येथील पाटबंधारे शाखा कार्यालय वाèयावर

0
28
 सडक अर्जुनी, दि.२८– सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे पाटबंधारे विभागाच्यावतीने शाखा कार्यालयाची इमारत तयार करण्यात आली असून या कार्यालयामध्ये गेल्यावर्षभरापासून कुणीच नसल्याने हे कार्यालयच वाèयावर आहे.एकही कर्मचारी इकडे फिरकत नसल्याने घाणीचे सामा्रज्य पसरले असून शासकीय रेकार्डही अस्तव्यस्त पडलेला दिसून येत आहे.विशेष म्हणजे गोंदिया पाटबंधारे विभागांतर्गत हे कार्यालय येत असून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून असलेले बनसोडे यांच्याकडे या कार्यालयाची जबाबदारी असल्याचे बोलले जात आहे.या कार्यालयातील विजेचे मीटरही विज वितरण कंपनीने बिलाचा भरणा न झाल्यामुळे काढून नेले आहे.कर्मचारी या कार्यालयात उपलब्धच राहत नसल्याने परिसराती शेतकèयांना मात्र हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.शिवसेनेचे तालुका प्रमुख सदाशिव विठ्ठले यांनीही या कार्यालयाच्या दुरावस्थेबद्दल qचता व्यक्त करीत कुणीही कर्मचारी राहत नसल्याने शेतकèयांना त्रास सहन करावा लागत असल्याचे म्हटले आहे.सोबतच पाटबंधारे विभागाने त्वरीत लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.