बीडीओ मारहाणप्रकरण;गोंदियात दुसèया दिवशी फलकच सहभागी

0
11

गोंदिया,दि.२८-उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाèयांना भररस्त्यात झालेल्या मारहाणीचे राज्यात पडसाद उमटले असून, महाराष्ट्र विकास सेवा संघटनेच्या अधिकाèयांनी २६ फेबुवारीपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेतंर्गतचे अधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले असून आंदोलनाच्या दुसèया दिवशी मात्र फलकाशिवाय कुणीही दिसत नव्हता.तर पहिल्या दिवशी मात्र पाच ते सहा अधिकारी हे बसून होते. महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाèयांना संरक्षण देण्यासाठी एक शस्त्रधारी पोलीस देण्याची मागणी गोंदिया येथील संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र विकास सेवेच्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाèयांना शासकीय काम करताना शिवीगाळ करणे,धक्काबुक्की करणे,मारहाण करणे असे प्रकार वाढत आहे. उस्मानाबाद जिल्ह्णातील परांडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाèयांना भर रस्त्यावर अमानुषपणे मारहाण करण्यात आली असून, सदर कृत्य हे मानसिक मनोबल खच्चीकरण करणारे आहे.
राज्यतील ३४ जिल्हा परिषद मुख्यालय, ३५६ पंचायत समित्यास्तरावर कार्यरत असलेले गटविकास अधिकारी,सहायक गटविकास अधिकारी यांना संरक्षण म्हणून एक शस्त्रधारी पोलीस देण्याची मागणी संघटनेने केली आहे.