घोटीत विश्वकर्मा जयंती साजरी

0
18

गोरेगाव,दि. २८:- गोरेगाव तालुका लोहार समाज संघटना, गोरेगाव च्या वतीने घोटीत ता २५ फेब्रुवारीला विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुलाल मेश्राम हे होते दिपप्रज्वलन जिल्हा सचीव अनिल मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन माया साऊसकार, रिना मेश्राम, लखन मेश्राम, किशोर सोनवाने, सुरजलाल सोनटक्के, गोवर्धन मेश्राम, बाबुलाल बागडे, सुकराम बागडे, रमेश मेश्राम, राजकुमार मेश्राम व समाज बांधव, महीला उपस्थित होते.या कार्यक्रमात समाज बांधवाची स्थिती व परिस्थती या विषयावर उपस्थितांनी मार्गदर्शन केले.
समाज बांधवांच्या हाती काम नाही यामुळे दोन वेळच्या जेवनाकरीता तारेवरची कसरत करावी लागत आहे लोहार समाज आता बेरोजगार झालेला आहे या मुलामुलीचे शिक्षण देणे कठीण आहे लोहार समाजास सवलतीच्या दरावर लाकुड उपलब्ध केल्यास हातास काम मिळेल व आर्थिक बाजु बळकट करण्यास मदत होणार असल्याने एकतेने मागण्या मांडणे आवश्यक आहे.या कार्यक्रमा दरम्यान गोरेगाव तालुका लोहार समाज संघटना व महीला लोहार समाज संघटना कार्यकारणीची निवड निवडणुक निर्णय अधिकारी अनिल मेश्राम व गो को मेश्राम यांच्या उपस्थित घेण्यात आली.महीला लोहार समाज संघटना अध्यक्षपदी माया साऊसकार, सचीव रिना मेश्राम व पुरुष लोहार समाज संघटना अध्यक्षपदी राजकुमार मेश्राम व सचीव पोरस शेंडे यांची निवड करण्यात आली यानंतर अध्यक्ष हे सदस्यांची निवड करतील असे निवडणुक निर्णय अधिकारी अनिल मेश्राम व गो को मेश्राम यांनी जाहीर केले.सुत्रसंचालन पोरस शेंडे व आभार प्रदर्शन लखन मेश्राम यांनी केले