फरकाची तिकिट न बनविता ४०० रुपये घेऊन टीसी फरार

0
7

नागपूर,दि.२८ः आज सकाळी नागपूर स्थानकावरून शेगावकरीता गितांजली एक्सप्रेसने निघालेल्या एका प्रवाशाकडून आरक्षित तिकीटाच्या फरकाचे पैसे न घेता अधिकचे पैसे घेत वर्धा स्थानक येताच टिसी फरार झाल्याची घटना आज बुधवारला घडली.सविस्तर असे की नागपूर निवासी श्रीरंग व्ही.साधू हे सर्वसाधारण तिकीट काढून आरक्षित डब्यात बसले.त्यांच्यासोबत असलेल्या मित्राचे आरक्षण होते.त्यामुळे आपण सोबत जाऊ आणि टिसी येताच फरकाची रक्कम देत आरक्षित डब्यातून प्रवास करु या बेतात प्रवाशी श्रीरंग साधू हे टीसीची वाट बघत बसले होते.तेवढ्यातच नागपूर वर्धा दरम्यान एम.तुपरवार नामक पांढरा कोट घालणाèया टिसीने आपण भरारी पथाकातील असल्याचे सांगत फरकाची पावती न देता संबधीत प्रवाशांकडून फाईनच्यानावावर ४०० रुपये घेतले.मात्र त्याची पावती न देता खिश्यात ठेवले आणि वर्धा स्थानक येताच सदर टीसी पसार झाला.रेल्वेगाडी शोधूनही मिळेना अशा परिस्थितीच काळ्या कोटातील दुसरे टिसी हे मात्र ११० रुपयात अतिरिक्त तिकिट बनवून देत होते.त्यांनीही या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त केली.नागपूर स्थानकावरुन ज्यावेळी गितांजली एक्सप्रेस रवाना होते त्यावेळी आरक्षण तिकीट काऊंटर सुरु नसते आरक्षण तिकीट काऊंटर हे सकाळी ८ नंतर सुरु होत असल्याने त्या आधीच्या प्रवाशांनी काय करावे असा प्रश्न उपस्थित करीत साधू यांनी तुपरवार नामक टिसीवर रेल्वेप्रशासनाने त्वरीत कारवाई करावी अशी मागणी केली आहे.