27 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

0
36

तिरोडा,दि.०६ : तिरोडा येथून ५ किमी अंतरावरील बिरसी येथील कावळे परिवारातील युवकाचा कमरगाव येथील चोरावार परिसरातील मुलीचे ५ मार्चरोजी रात्री लग्न सोहळ््यात वड्ढहाडी म्हणून गेलेल्या बिरसी येथील युवकास कमरगाव/मांडोदेवी मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारला घडली.
५ मार्च रोजी बिरसी येथील जितेंद्र तेजराम कावळे याचा विवाह गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथील हिरालाल चौरावार यांच्या मुलीशी निश्चित झाल्याप्रमाणे बिरसी येथून वरात सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान कमरगाव येथे पोहोचून जानोश्यावरून नाचतगाचत वरात वधू मंडपी पोहोचून नियोजित वेळी लग्न सोहळा पार पडून जेवनाच्यावेळी वरासोबत वड्ढहाडी म्हणून आलेला युवक पप्पू दिसून न आल्याने शोध घेतला असता कमरगाव-मुंडीपार-मांडादेवी मार्गावर अपघात झाल्याचे समजल्याने वराकडील मंडळींनी तेथे जाऊन पाहिले असता रक्ताच्या थारोळ््यात पप्पू प्रकाश गौतम (४४) रा. बिरसी (तिरोडा) याचा मृतदेह आढळून आल्याने गोरेगाव पोलिसांना सुचना देण्यात आल्यावरून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून उत्तरीय तपासणीकरिता मृतदेह उपजिल्हा रुग्णालय गोरेगाव येथे पाठविले असून लग्नात वड्ढहाडी म्हणून आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याचे कळताच कमरगाव व बिरसी येथे शोककळा पसरली आहे.