गोंदिया जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी आनंदराव तुरकर

0
13

गोंदिया,दि. ७:- महाराष्ट्र राज्य गाव पोलीस पाटील संघटनेच्या गोंदिया जिल्हा कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली.यामध्ये नवनियुक्त अध्यक्षपदावर आनंदराव तुरकर यांची तर कार्याध्यक्षपदी  मोहनसिंह बघेल, सचिवपदी मनोहरसिंह चौहान यांची निवड करण्यात आली.सोबतच संघटक कुंजीलाल भगत, उपाध्यक्ष साहेबराव बंसोड व सौ.नर्मदाबाई चुटे, सहसचिव प्रविण कोचे व सौ. गायत्रीबाई पवार, सहसंघटक रविन्द्र बिसेन, कोषाध्यक्ष चंद्रपाल शहारे, सहकोषाध्यक्ष  राहुल बोरकर,प्रचारप्रमुख प्रदिप बावनथडे यांचा समावेश आहे.तर कार्यकारीणी सदस्यामध्ये युवराज ताजने,आनंदराव शिवणकर,हेतराम रहांगडाले,देवेन्द्र नागपुरे,लक्ष्मीकांत कोल्हे,ओमेश्वर लाडे, उमेशकुमार बावनकर, श्यामलाल नागपुरे, अरविंद चौरे,राजु कडव,तिर्थराज पटले,अशोक शहारे,पुरणलाल डाहाके,तेजलाल पटले,सुरेश कोरे,प्रदिप चुटे,चंद्रसेन राहांगडाले,भिमराज साखरे,श्रीधर लंजे, मधुकर पर्वते, सौ.मंगला तिडके, सौ. ऊषाताई बोपचे, सौ. हेमेश्वरी चौधरी, सौ. प्रतिभा कोरोंडे, सौ. अनिता अंबादे, सौ. हेमलता देशमुख, सौ. शालुताई डोंगरे, सौ.बबिता रंगारी, सौ. इंदिराबाई चौधरी या सर्वांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीसाठी मिथुन शेखर पटले यांचे विशेष आभार मानण्यात आले.संचालन विनोद ठाकुर यांनी केले तर आभार इंदुमती रहांगडाले यांनी मानले.