आरोग्य पुरस्कारांवर साहुर प्राथमिक आरोग्य केंद्राची मोहोर

0
9

वर्धा,दि.09 : आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाºया संस्था, कर्मचाºयांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुरस्कारांनी गौरविण्यात आले. जि.प. आरोग्य विभागाद्वारे आयोजित कार्यक्रमात आशा स्वयंसेविका यांचा सन्मान, फ्लॉरेन्स नायटींगल पुरस्कार, डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार, कुटूंब कल्याणमध्ये उल्लेखनिय कार्य करणारे अधिकारी व कर्मचारी तथा कायाकल्प योजनेंतर्गत आरोग्य संस्थेला पुरस्कार देण्यात आले. यंदाचा कायाकल्प व प्राथमिक आरोग्य केंद्राचा पुरस्कार साहुर केंद्राने पटकावून कार्यक्रमावरच मोहोर लावली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी तर अतिथी म्हणून सीईओ अजय गुल्हाणे, आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट, जिल्हा शल्य-चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, सदस्य संजय शिंदे, धनराज तेलंग, विवेक हळदे, पंकज सायंकार, विमल वरभे, चंद्रकला धुर्वे, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. करुणा जुईकर, आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत, डॉ. विनोद वाघमारे, पं.स. सभापती महानंदा ताकसांडे आदी उपस्थित होते.