अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन

0
8

भंडारा,दि.20ःशेतकरी संघटनांची सुकाणू समिती महाराष्ट्र यांच्या आवाहनानुसार भंडारा येथे महाराष्ट्र राज्य किसान सभा भंडाराच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (ता.१९) दुपारी १२ ते ४ या वेळेत संपूर्ण कर्जमुक्ती व इतर मागण्यांसंदर्भात अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळातर्फे मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबरा कोरा करा, डॉ. स्वामिनाथन आयोजगाच्या शिफारशी लागू करा, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव द्या, वन व महसूल जमिनीचे वैयक्तिक व सामूहिक दावे मंजूर करा व तिन पिढय़ांची अट रद्द करा, शेतकरी, शेतमजूर, निराधार, असंघटीत कामगार यांना वयाच्या ६0 वर्षानंतर ५ हजार रुपये मासिक पेंशन देण्याचा कायदा करा, शेतकर्‍यांचे वीज बिल माफ करा व घरगुती विजेचे दर कमी करा, एपीएल, बीपीएलचा भेद न करता सर्वांना स्वस्त दारात राशनच्या दुकानातून जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करा व जिर्ण राशन कार्ड बदलून द्या, वन्य प्राण्यांच्या पीक नुकसानीचा विमा योजनेच्या निकषात समावेश करून संपूर्ण नुकसान भरपाई द्या, शेताला सरकारी खर्चाने कुंपन करा, ६0 वर्षांचे वृध्द व निराधारांना मिळणार्‍या आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्यात यावी आदी मागण्यांचा सदर निवेदनामध्ये समावेश आहे.
सदर आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्र राज्य किसान सभेचे कॉ. माधवराव बांते, कॉ. सदानंद इलमे, कॉ. शिवकुमार गणवीर, कॉ.हिवराज उके यांनी केले. यावेळी शांताबाई बावणकर, वामनराव चांदेवार, गजानन पाचे, अरूण पडोळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.