24.5 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

0
30

वर्धा,दि.20 – समुद्रपुर तालुक्यातील नागपुर – चंद्रपुर मार्गावर डोंगरगाव शिवारात राञीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.हा बिबट्या एक ते दीड वर्षाचा असल्याे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे . पोथरा नदीजवळील झुडपांमध्ये वातावरण थंड असल्याने या ठिकाणी वन्यप्राण्यांचे वास्तव्य असते. हा बिबट्या सुद्धा या ठिकाणी वास्तव्य करून होता .रस्ता पार करीत असतांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मुत्यु झाला आहे . घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठत बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.