24.3 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ कुरखेड्यातील रेडीमेड दुकानाला आग,लाखोचे नुकसान

कुरखेड्यातील रेडीमेड दुकानाला आग,लाखोचे नुकसान

0
41

कूरखेडा,दि.20ःशहरातील जगदीश क्लॉथ अँडं रेडीमेड दुकानाला आज सांयकाळी सहा वाजेचा सुमारास शार्टसर्किट मूळे आग लागल्याने दुकानातील कपड्या सहित फर्निचर व इतर साहीत्य जळून खाक झाले या घटनेत 12 ते 15 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे
आज मंगळवारला येथील बाजारपेठ बंद राहत असल्याने ही दुकान बंद होती सायंकाळी सहा वाजेचा सुमारास बंद दुकानातून धुर निघत असल्याचे काही नागरीकांचा लक्षात येताच त्यानी दुकानदार खुशाल बन्सोड याना माहीती दिली त्यानी लगेच दुकानात येत शटर उघडून बघीतले असता दुकानातील कपडे व इतर साहित्यानी पेट घेतला असल्याचे लक्षात आले व आग नियंत्रीत करण्याकरीता लगेच मदत कार्य सूरू करण्यात आले नगर पंचायत चा पानी टँकर द्वारे पानी टाकत आगीवर नियंत्रण मीळविणियाचा प्रयत्न करण्यात आला मात्र आग नियंत्रणात येण्यापुर्वीच दुकानातील कापड फर्नीचर व उतर साहीत्य जळून खाक झाल्याने अंदाजे 12 ते 15 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे विषेश म्हणजे एक महिण्यापुर्वीच या दुकानाला अगदी लगत असलेल्या केतन स्वीट मार्ट या दुकानाला सूद्धा गँस सिलेंडर लीकेज झाल्याने आग लागली होती येथे वारंवार अशा घटणा होत असल्याने शाशनाने येथील नगर पंचायत स्तरावर तात्काळ अग्नी शमन यंत्र उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नगराध्यक्श डं.. महेन्द्रकुमार मोहबंसी व नागरीकानी केली आहे