अतिक्रमणधारकांची प्रकरणे निकाली काढा – आ. रहांगडाले

0
7

तिरोडा,दि.20ः-सर्वांसाठी घरे या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी तालुक्यात सन २0११ पूर्वी अतिक्रमण करून वास्तव्य करणार्‍या जनतेला कायमस्वरूपी घर मिळण्यासाठी प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढा, असे निर्देश आ. विजय रहांगडाले यांनी आयोजित आढावा बैठकीत संबंधित अधिकार्‍यांना दिले.या आढावा बैठकीत उपविभागीय अधिकारी गंगाधर तडपाडे, तहसीलदार संजय रामटेके, कृषी अधिकारी पोटदुखे, जावेद इनामदार ल.पा. उपविभागाचे उपविभागीय अभियंता अनंद जगताप, वन परिक्षेत्राधिकारी विजय कदम, मग्रारोहयोचे तांत्रिक अधिकारी मेश्राम उपस्थित होते.
गावरान जमीन, सार्वजनिक वापरातील जमीन व वनक्षेत्र तसेच जमिनीवर वास्तव्य करणे शक्य नाही, अशा जमिनी वगळून इतर शासकीय धारकांचे गाव निहाय प्रस्ताव तयार करण्यात यावे, तसेच गावरान जमिनीवर जर अतिक्रमणधारकांना नियमाकूल करण्याबाबत ग्रामपंचायतीने निर्णय घ्यावा तसेच अशी प्रकरणे अतिक्रमीत केलेल्या जागेच्या दुप्पट जागा निवडण्यात यावी, त्याच प्रमाणे ५00 फूटपर्यत २0११ पयर्ंत अतिक्रमण केलेल्या धारकांना प्रतिवार्षिक दरनुसार 0.५ शुल्क करावी तसेच तालुक्यातील अतिक्रमण धारक गरीब जनतेला राहण्यासाठी जागा देऊन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे बसविता येतील, याकरिता ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी व तहसीलदारामार्फत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही आ. विजय रहांगडाले यांनी केले.